डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे, तळेगाव दाभाडे येथे आज महाराष्ट्र शासनाच्या अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आयोजित ऑनलाइन संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी गुगल मीटच्या माध्यमातून सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी डॉ. सुशांत पाटील व ॲड. अनुजा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश शिरबहादुरकर आणि डीन ॲकॅडेमिक डॉ. योगेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री. विजयानंद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. अमली पदार्थांपासून दूर राहणे, व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करणे आणि समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.





