ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी : दिवाळीनिमित्त वात्सल्य संस्थेसाठी ४,५०० मेणबत्ती पाकिटांचे पॅकिंग

चिंचवड : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीजच्या विद्यार्थी विकास समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना व प्रतिभा ज्यूनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी सणाचे औचित्य साधून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

या उपक्रमांतर्गत देहूगाव येथील ‘वात्सल्य मतिमंद, निराधार मुले व महिला निवासी शाळा’ या संस्थेसाठी विद्यार्थ्यांनी तब्बल ४,५०० मेणबत्ती पाकिटांचे पॅकिंग केले. दिवाळीच्या आनंदात या विशेष घटकांना हातभार लागावा आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश होता.

हेही वाचा –  महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या; ठाणे, सांगली, सोलापूरसह पोलीस यंत्रणा अलर्ट

या सामाजिक उपक्रमात प्रतिभा महाविद्यालयाच्या सिनिअर व ज्यूनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी एकोप्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे पॅकिंग पूर्ण करत ‘टीमवर्क’, सामाजिक बांधिलकी व सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. या उल्लेखनीय कार्याबद्दल वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका वृशाली देवतरासे यांनी कमला एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ . दीपक शहा, प्राचार्या , प्राध्यापक , व विद्यार्थ्यांचे विशेष आभार मानले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिभा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आणि आयक्यूएसी विभागाच्या समन्वयक डॉ. श्रुती गणपुले यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

“विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सहानुभूती आणि समाजसेवेची भावना रुजावी, यासाठी असे समाजाभिमुख कार्यक्रम नियमितपणे राबविले जातात. भविष्यातही गरजेनुसार सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा उपक्रमांचे आयोजन केले जाईल,” असे मनोगत संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन विद्यार्थी विकास समितीच्या प्रमुख प्रा. ज्योती इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. सुप्रिया गायकवाड व अन्य प्राध्यापकांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group