‘मिर्झापूर : द मूव्ही’ ओटीटीवर रिलीज! एक्स्टेंडेड कटसह पाहता येणार चित्रपट

Mirzapur The Movie Ott Release | प्रसिद्ध वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरलेला ‘मिर्झापूर : द मूव्ही’ हा बहुचर्चित चित्रपट अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा आता ‘एक्स्टेंडेड कट’ (अतिरिक्त दृश्यांसह) प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. थिएटरमध्ये रिलीज झालेल्या आवृत्तीपेक्षा ओटीटीवरील व्हर्जनमध्ये काही खास सीन्स जोडण्यात आले असल्याने प्रेक्षकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे.
गुरमीत सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट ३० ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओ (Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. ॲक्टिव्ह सबस्क्रिप्शन असलेले प्रेक्षक हा चित्रपट हिंदी ऑडिओ आणि इंग्रजी सबटायटल्ससह घरबसल्या पाहू शकतात. प्राईम व्हिडीओने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत “भौकाल आ चुका है” या कॅप्शनसह या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे.
हेही वाचा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भेटवस्तू स्वीकारू नयेत
View this post on Instagram
कलाकारांची तगडी फौज
या चित्रपटात कालीन भैया (पंकज त्रिपाठी), गुड्डू पंडित (अली फजल) आणि बबलू पंडित/मुन्ना भैया (दिव्येंदू) या गाजलेल्या जुन्या पात्रांसोबतच रवी किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, जितेंद्र कुमार आणि मोहित मलिक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मिर्झापूरच्या सत्तेसाठी आणि गादीसाठी पुन्हा पेटलेला रक्तरंजित संघर्ष हे या चित्रपटाचे मुख्य केंद्रस्थान आहे.
बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक गल्ला
चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने कमाईचा सपाटा लावला होता. पहिल्याच दिवशी ३०.९० कोटींची विक्रमी कमाई करणाऱ्या या सिनेमाने दुसऱ्या दिवशी ३८.४० कोटी, तर तिसऱ्या दिवशी ४३.०५ कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या आठवड्यातच १४८.४५ कोटींची मजल मारत, या चित्रपटाने जगभरात तब्बल ३३९.८४ कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन नोंदवले आहे.




