आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोबोटिक्स प्रदर्शनाचा भव्य सोहळा; ८०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग!
१,५०० हून अधिक पालकांची उपस्थिती; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि तंत्रज्ञानातील कौशल्यांना मिळाले व्यासपीठ

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या वडमुखवाडी येथील ‘आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल’मध्ये नुकताच ‘Robotics Culmination and Exhibition’ या भव्य उपक्रमाचा उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. या विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शनात ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला, तर १,५०० हून अधिक पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि तांत्रिक कौशल्यांचे भरभरून कौतुक केले.
नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे आकर्षक सादरीकरण
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल आणि सॉफ्टवेअर अशा विविध विभागांतर्गत अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. वर्गात शिकविल्या जाणाऱ्या मूलभूत संकल्पनांचा प्रत्यक्ष प्रयोगांमध्ये केलेला प्रभावी उपयोग हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले. विशेषतः इयत्ता पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग अत्यंत आत्मविश्वासाने पालकांसमोर मांडत त्यामागील संकल्पना स्पष्ट केल्या. इयत्ता चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून साकारलेले प्रकल्प आणि कोडिंगच्या माध्यमातून विकसित केलेल्या उपकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, तार्किक विचारशक्ती आणि समस्या निवारण क्षमता (Problem-solving skills) स्पष्टपणे दिसून आली.
हेही वाचा – खरगेंच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा सवाल; झाडतोड आणि अर्थखात्याच्या मागणीवरही भाष्य

सर्वांगीण विकासाला शाळेचे प्राधान्य
केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणे, हा शाळेच्या शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि सर्जनशील विकासासाठी शाळा कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेत संगीत क्षेत्रासाठी तीन स्वतंत्र कक्ष, तर विविध खेळांसाठी १२ तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षक कार्यरत आहेत. रोबोटिक्स, कोडिंग, संगीत आणि क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांमुळे विद्यार्थ्यांना आपली आवड जोपासण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
मान्यवरांचे मार्गदर्शन व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या भव्य प्रदर्शनाच्या यशस्वी नियोजनासाठी शाळेचे प्राचार्य श्री. जोतिबा सुरवसे, सर्व समन्वयक आणि शिक्षकवृंदाने अमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी वाटचालीसंदर्भात पालकांनी शाळेच्या विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले.
‘प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रतिभेला व्यासपीठ, प्रत्येक कल्पनेला दिशा आणि प्रत्येक स्वप्नाला नवी भरारी’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणणारा हा उपक्रम अनुभवाधारित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना केवळ पुस्तki ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्वांगीण विकासाला (Holistic Development) नेहमीच प्राधान्य देतो. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाने आणि शाळेच्या उच्च गुणवत्तापूर्ण वाटचालीने आमचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. आमचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच शाळा शैक्षणिक व सह-शक्षणिक क्षेत्रात नवनवीन यश संपादन करत आहे. शाळेच्या व्यवस्थापनातर्फे मी सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करते.”
— मिस मित्तल शहा, सीओओ, आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल
आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रातोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे. आमच्या विद्यार्थ्यांची / शिक्षकांची ही कामगिरी अतिशय अभिमानास्पद असून, यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आम्ही या पुढे ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी अशीच मेहनत घेत राहू.”
-डॉ. पुष्कर चौबे, सीईओ, आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल




