TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘अर्थखाते आम्हाला परत मिळायला हवे, ते आमचे हक्काचे खाते’; छगन भुजबळांचे विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक; हिवाळी अधिवेशनापूर्वी खाते मिळण्याची भुजबळांना अपेक्षा, विलीनीकरणाच्या चर्चेचा इन्कार

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या दाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थखात्यासाठी आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अर्थखाते पक्षाला परत मिळायला हवे, अशी भूमिका स्पष्ट केली.

‘अर्थखाते आमचे हक्काचे’

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “सुनेत्रा पवार आमच्या उपमुख्यमंत्री आहेत. अर्थखाते आम्हाला परत मिळायला हवे. ते आमचे हक्काचे खाते आहे. ते परत देणार होते. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या विषयावर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांना दिल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे अर्थखात्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेससोबत असतानाही एखादे खाते बदलल्यास दुसरे खाते मिळत असल्याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.

हेही वाचा –  ‘शेतकऱ्यांचे पीककर्ज १०० टक्के माफ करा’; सतेज पाटील यांची मागणी, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईची मागणी

हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णयाची अपेक्षा

“आम्हाला अर्थखाते पाहिजेच आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी आम्हाला खाते मिळेल, असे वाटते,” असे भुजबळ म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थखात्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, इतर खात्यांची अदलाबदल होणार असल्याची चर्चा असली, तरी भुजबळ यांनी त्याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार असून त्यासंदर्भात बैठक झाल्याचा दावा केला जात असताना, भुजबळ यांनी मात्र विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्र्यांकडे

अजित पवार यांच्याकडे राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी होती. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे खाते स्वतःकडे घेतले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली; मात्र अर्थखाते अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसने हे खाते पुन्हा मिळवण्यासाठी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर भुजबळ यांनी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली असली, तरी अर्थखात्याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group