ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

राजमाता जिजाऊ कॉलेजचे तलवारबाजी स्पर्धेत यश

पिंपरी | मनपा शाळा कासारवाडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी 19 वर्ष वयोगटात ईपी, फॉईल, सॅबर या क्रीडा प्रकारात सांघिक प्रथम क्रमांक मिळवित घवघवीत यश संपादन केलेले आहे.

शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेतील निकाल

19 वर्षाखालील मुली

फॉईल क्रीडा प्रकार – प्रथम क्रमांक 1) कु. दिव्या जगताप, 2) कु. श्रेया वहिले

सॅबर क्रीडा प्रकार- प्रथम क्रमांक- 1) भूमिका जगताप 2) चैत्राली लांडगे 3) प्राची वाघमोडे 4) प्राजक्ता केदारी

ईपी क्रीडा प्रकार – प्रथम क्रमांक 1) कु. आंचल चव्हाण.

हेही वाचा

‘..तेव्हा श्रीलंका- बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवते’; सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला इशारा

19 वर्षाखालील मुले-

सॅबर क्रीडा प्रकार- प्रथम क्रमांक 1) कु. शुभम जाधव

फॉईल क्रीडा प्रकार – प्रथम क्रमांक 1) कु. अथर्व लांडगे

ईपी क्रीडा प्रकार 1) कु. गौरव साळी

सर्व विजेत्या खेळाडूंची दि.26 ते 27 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क जिल्हा अहिल्यानगर येथे होणाऱ्या शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिं.चि. मनपा. स्थायी समितीचे मा.अध्यक्ष श्री अजितभाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर, पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button