Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘..तेव्हा श्रीलंका- बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवते’; सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला इशारा

नवी दिल्ली | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आणि एसआयआरच्या (SIR) विरोधात दिल्लीसह देशभरात आंदोलन तीव्र होत असतानाच, प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “जेव्हा लोकशाहीत शांततापूर्ण निदर्शने करण्याची परवानगी दिली जात नाही, तेव्हा श्रीलंका आणि बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवते,” असा थेट आणि सूचक इशारा वांगचुक यांनी दिला आहे. सरकारने जनतेचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात स्पष्ट केले.

सरकारकडून आंदोलकांवर होणाऱ्या कठोर कारवाईचा समाचार घेताना वांगचुक म्हणाले, “युनायटेड किंगडम, नॉर्वे आणि स्वीडन यांसारख्या प्रगत लोकशाही देशांमध्ये नागरिकांना थेट संसदेच्या समोर उभे राहून आंदोलन करण्याची मोकळीक दिली जाते. मात्र, भारतात आंदोलनाची ठिकाणे संसदेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवली जातात. जंतर-मंतरसारखे निश्चित केलेले ठिकाणही संसदेपासून बऱ्याच अंतरावर आहे.”

हेही वाचा

भारत-पाकिस्तान संघ दोनदा भिडणार; अंडर-१९ आणि रायझिंग आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थी व नागरिकांच्या असंतोषाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे काय परिणाम होतात, याची आठवण करून देताना त्यांनी शेजारील देशांचे दाखले दिले. “श्रीलंका आणि बांगलादेशमधील जनआंदोलने ही याची ताजी उदाहरणे आहेत. सरकारने लोकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली किंवा अनावश्यक निर्बंध लादले, तर जनता सरकारच्या पूर्णपणे विरोधात उभी राहते, ज्यामुळे अखेर देशाचे आणि सरकारचेच मोठे नुकसान होते,” असे वांगचुक यांनी नमूद केले.

दिल्लीत तणाव; १ नोव्हेंबरला इंडिया आघाडीची रॅली

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून, राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आंदोलकांची धरपकड सुरू असतानाच, आता ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत भव्य निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हा राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group