Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

“मी बांगलादेशला समर्थन दिलं नाही, हा माझ्याविरोधात अपप्रचार”; नेहा बोराचा पलटवार

नवी दिल्ली | सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून ‘बांगलादेशसाठी काम करत असल्याचा’ आरोप झाल्यानंतर विद्यार्थी नेत्या नेहा बोरा हिने नवा व्हिडिओ जारी करत दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारला थेट उत्तर दिले आहे. मूळ व्हिडिओमधील लोगो आणि नाव जाणूनबुजून क्रॉप करून, तो एका राजकीय अजेंड्याचा व अपप्रचाराचा भाग म्हणून पसरवला जात असल्याचा दावा नेहा बोराने केला आहे.

व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना नेहा बोरा म्हणाली, “सोशल मीडियावर माझ्या एका व्हिडिओच्या १० हजार आवृत्त्या फिरताना तुम्ही पाहिल्या असतील. या मूळ व्हिडिओच्या कोपऱ्यात असलेला लोगो पद्धतशीरपणे क्रॉप करण्यात आला आहे, कारण तो लोगो ‘सोशालिस्ट स्टुडंट्स फ्रंट’च्या (SSF) विद्यार्थ्यांचा होता. हा व्हिडिओ लोकशाही आणि तरुणांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या लढ्यातून प्रेरणा घेणारा होता. मात्र, त्यातील लोगो आणि माझे नाव हटवून तो एका विशिष्ट अपप्रचारासाठी वापरला जात आहे.”

आपल्या भूमिकेविषयी बोलताना तिने सांगितले की, “बांगलादेशात झालेली ‘जेन-झी’ (Gen-Z) चळवळ ही लोकशाहीसाठी होती. तेथील सोशालिस्ट स्टुडंट्स फ्रंट हे अल्पसंख्याक हिंदूंच्या बाजूने उभे राहून व्हिडिओ तयार करत आहेत आणि संघर्ष करत आहेत. आम्ही त्यांच्या या प्रामाणिक लढ्यातून प्रेरणा घेतली होती. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवला गेला होता; मात्र बांगलादेशातील उजव्या विचारसरणीच्या गटांनी तो उचलला आणि नंतर भारतातील उजव्या विचारसरणीच्या लोकांनी तो व्हायरल केला. एकमेकांविरुद्ध लढण्याचा आव आणणारे हे दोन्ही गट प्रत्यक्षात एकत्र येऊन काम करत आहेत.”

हेही वाचा

“श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना ५०० कोटी पोहोचले”; मनोज जरांगेंनी ऐकवली धक्कादायक ऑडिओ क्लिप


नेहाने सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हटले की, “देशातील सरकारने जनतेच्या मनावर हे बिंबवले आहे की बांगलादेशचे नाव ऐकताच विचलित व्हावे आणि मनात हिंसेचा विचार यावा. परंतु, आम्ही जसा रांचीमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, तसाच बांगलादेशातील विद्यार्थी चळवळीच्या संघर्षाला पाठिंबा दिला. आम्ही भाजप किंवा अभाविपच्या आंदोलनांना पाठिंबा देणार नाही, ज्यांनी माझ्यावर शाईफेक केली होती.”

‘SIR’ विरोधात लढा आणि जंतर-मंतरवरील आंदोलनाची आठवण

आपल्या आंदोलनांची पार्श्वभूमी स्पष्ट करताना तिने सांगितले की, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला होता; मात्र ‘आरक्षण हटाओ’ आंदोलनाला आमचा विरोध होता. “जर मतदारांच्या पडताळणीतून (SIR) नागरिकांचा मतदानाचा मूलभूत हक्कच हिरावून घेतला जात असेल, तर आम्ही गप्प बसायचे का? वंचित घटकांपर्यंत लोकशाही पोहोचली पाहिजे आणि निवडणुका पारदर्शक पद्धतीनेच पार पडल्या पाहिजेत. जंतर-मंतरवर आम्ही २३ दिवस उपोषण केले, तेव्हा आम्हाला ‘दहशतवादी’ आणि ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवण्यात आले; तरीही आमचा लढा सुरूच राहिला. आम्ही दीर्घकाळापासून रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहोत,” असे नेहा बोराने स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button