“श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना ५०० कोटी पोहोचले”; मनोज जरांगेंनी ऐकवली धक्कादायक ऑडिओ क्लिप

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांनी ५०० कोटींचे जे आरोप केले त्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. दसरा मेळाव्यातही मनोज जरांगेंवर टीका करण्यात आली. दरम्यान मनोज जरांगे यांनी भाजपाच्या लोकांच्या बैठकीची ऑडिओ क्लिप प्ले करत पुरावे सादर करतोय असंच म्हटलं आहे. तसंच या प्रकरणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी लक्ष घालावं असं म्हटलं आहे.
आपल्यावर जे काही तीन वर्षांपासून आरोप केले जात आहेत आणि आंदोलन चिरडण्याचा हा उद्देश आहे. मराठा समाजावर गरळ ओकायची, मराठ्यांचं आंदोलन बदनाम करण्याचे प्रय़त्न चालले आहेत. माझ्या विरोधात षडयंत्र सुरू आहेत. हे षडयंत्र कोण करतंय हे माझ्या समाजापर्यंत गेलं पाहिजे. आपलं आंदोलन हाणून पाडायचं हेच काही जणांना हवं आहे.
मराठा समाजाने शब्दा-शब्दावर लक्ष ठेवावं. निवडणुकांच्या काळात, आंदोलनाच्या काळात, उपोषणाच्या काळात सगळ्या वेळी षडयंत्र केलं गेलं आहे. किती भयंकर हा डाव आहे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. गरीबाने या राज्यात कुठलं काम करणं किती अवघड झालं आहे हे प्रत्येक मराठा समाजाने लक्षात घेणं आवश्यक आहे. जी काही कुजबूज आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की मी किती भयंकर त्रासातून जातो आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की मी पैसे घेतले नाहीत, दिलेही नाहीत. मग एवढं भयंकर षडयंत्र का रचलं गेलं? मी आता तुम्हाला एकनाथ शिंदेंनी सांगितल्या प्रमाणे पुरावे देतो आहे. असं म्हणत मनोज जरांगेंनी एक ऑडिओ क्लिप प्ले केली.
हेही वाचा
होर्मुझच्या सामुद्रधुनीत कुवेती तेल टँकरवर हल्ला; जहाजावरील २१ भारतीय खलाशी सुरक्षित
ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलं आहे?
“दरेकर आणि राणे यांनी बोलत आहेतच. उदयनराजे आणि इतर लोकांनी बोललं पाहिजे कारण मनोज जरांगे भाजपा पक्षच मराठा द्रोही आहे असं घोषित करतो आहे. कमी अधिक प्रमाणात त्या मेसेजचा प्रभाव पडतो आहे. भाजपाच्या मराठा नेत्यांनी उत्तरं देणं आवश्यक आहे. मराठा नेतेच नाही, ओबीसी वगैरे सगळ्यांनीच मनोज जरांगेला उत्तर दिलं पाहिजे. शेती, कर्जमाफी या ठिकाणी मनोज जरांगे शिरला आहे. मनोज जरांगे नरेटिव्ह तयार करून टाकतो आणि आपण उत्तर कसं द्यायचं या भानगडीत राहतो. अतुलजी उदयनराजेंशी बोलता येईल का? उदयनराजेंशी मला थेट नाही बोलता येणार पण बाकी लोकांशी बोलतो. निरंजन डावखरे आले होते काही त्याच्या विरोधातले काही लोकांशी बोलणं करून दिलं आहे. आपण शुचिता आणि पवित्रता पाळू. जे कुणी इच्छुक असतील मनोज जरांगेंच्या विरोधात बोलायला तर असतील नोटा सांजच्याला भेटा म्हणणाऱ्यांना भेटवावं, नाचवावं मोकळं करावं. हस्ते, परहस्ते मनोज जरांगेला डॅमेज करण्याची प्रक्रिया सुरू करायला काय हरकत आहे? आपल्या हाताने नको असेल तर दुसऱ्याच्या हाताने करू तशी माणसं आपल्याकडे आहेत. माझं मत आहे पार्टी फंड वापरायचा नसेल तर प्रत्येकाने आपला-आपला खर्च करावा त्यासाठी. सोशल मीडियावर कंटेट क्रिएशनची चर्चाही आपण करू. मनोज जरांगेला आवरलं नाही तर तो मराठवाड्यात तुम्हाला गिळून घेईल. प्रॉब्लेम मला जो दिसतो आहे की पक्षातलं कुणी काही बोलायला तयार नाही. आपण नुसतेच त्याला शरद पवार पैसे देत आहेत वगैरे आरोप करतो आहोत. त्याच्या विरोधात चार लोक बोलायला तयार असतील तर त्यांना पैसे आपण का द्यायचे नाहीत? आपल्याकडे पैसे नाहीत की काय? निरंजन आणि दरेकरांना काही माणसांची भेट घालून दिली आहे.”
जरांगे पाटलांना ५०० कोटी पोहचले आहेत-मिटिंगमधला संवाद
काही गोष्टी बोलून कराव्या लागतात, काही न बोलता कराव्या लागतात. भातखळकर तुम्ही लोकसत्तासाठी तुम्ही लेख लिहा, भातखळकर म्हणतात माझे लेख छापत नाहीत. तुम्ही लिहा तर कसे छापत नाही मी पाहतो. पुतळ्याचा मुद्दा वगैरे आता शांत होईल. कर्नाटकातलं प्रकरण समोर आणावं. संजय राऊतलाही जरा शिकवा गोष्टी, खूप बोलतो आहे. एका बाईशी बोलताना त्याची भाषा कशी आहे ते समोर आणा. जरांगे पाटील को ऑलरेडी ५०० करोड रूपये पहुंच चुके हैं. जो श्रीकांत शिंदे के माध्यमसे पहुंच चुके हैं. बाकी आप लोग क्या सोचतो है वो है ही. उसका पर्सनल टार्गेट देवेंद्र फडणवीस और बीजेपी रहेगा. मेरा कॅलक्युलेशन अलग है.




