Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सुनेत्रा पवार-अमित शाह भेटीने अर्थखात्याच्या चर्चेला पुन्हा वेग; हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होणार?

खासदार पार्थ पवारही भेटीत उपस्थित; अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्र्यांकडे, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांसाठी आग्रह

मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थखात्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी खासदार पार्थ पवारही उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशिवाय सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांनी अमित शाह यांची घेतलेली ही दुसरी भेट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

अर्थखाते सुनेत्रा पवारांकडे देण्याची मागणी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हे खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही यासाठी आग्रह धरल्याचे सांगितले जाते.

आता सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने अर्थखात्याच्या वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, या भेटीत अर्थखात्याबाबत नेमकी चर्चा झाली का किंवा यासंदर्भात कोणता निर्णय घेण्यात आला का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा –  गोकुळच्या विजयाने सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना टोला; ‘98 मतं बाद झाली नसती तर आणखी 5 ते 6 उमेदवार जिंकले असते’

पुण्यातील समन्वय बैठकीतही चर्चा?

दरम्यान, पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची समन्वय बैठक झाली होती. या बैठकीतही अर्थखात्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. मात्र, महायुतीमध्ये कोणतीही नाराजी किंवा वाद नसल्याचे भाजप आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले होते.

दुसरीकडे, १८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार नसल्याचा दावा केला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने अर्थखाते स्वतःकडे ठेवल्याची टीकाही त्यांनी केली होती.

हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होणार?

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि अर्थखात्याच्या वाटपाचा मुद्दा अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत चर्चेला आल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यातील भेटीगाठींनंतर अर्थखात्याबाबत महायुतीत काही निर्णय होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी अर्थखात्याच्या वाटपाबाबत निर्णय होतो का, की खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button