TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नागपुरातील दुर्गा मातेचे दर्शन; विविध उत्सव मंडळांना भेटी
पार्वतीनगर, सुयोगनगर, बारा सिग्नल, अजनीसह विविध भागांतील दुर्गा उत्सव मंडळांना भेट देत घेतले आशीर्वाद

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध दुर्गा उत्सव मंडळांना भेट देऊन दुर्गा माता मूर्तींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले आणि शहरातील विविध भागांतील दुर्गोत्सवात सहभाग नोंदवला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यू डायमंड दुर्गा उत्सव मंडळ, बारा खोली, पार्वतीनगर; श्री दुर्गा माता उत्सव मंडळ, सुयोगनगर; युवा दुर्गा उत्सव मंडळ, बारा सिग्नल; श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती, रेल्वे कॉलनी, अजनी आणि पाटीदार समाज दुर्गा महोत्सव, घाट रोड यांसह शहरातील अन्य मंडळांना भेटी दिल्या.
नागपुरातील विविध भागांत नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, दुर्गा माता दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या भेटींमुळे उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.




