ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर कार्यशाळा संपन्न

आकुर्डी | येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत (QIP) प्रायोजित “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) च्या बी. फार्मसी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. विनायक जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी नवीन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने प्राध्यापकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा, असे प्रतिपादन केले. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर अध्यापनातील सहाय्यक साधन म्हणून करावा; मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर, चिकित्सक विचारशक्तीवर आणि बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यशाळेत डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई येथील स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. राकेश सोमानी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या नवीन बी. फार्मसी अभ्यासक्रमाची रचना, उद्दिष्टे आणि प्रभावी अंमलबजावणी यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. सतीश पोळशेट्टीवार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फार्मसी शिक्षणातील अध्यापन व अध्ययन प्रक्रिया अधिक प्रभावी, आधुनिक आणि विद्यार्थी-केंद्रित कशी करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.

हेही वाचा

पाकिस्तानमध्ये भीषण दुर्घटना; खासगी शाळेचे छत कोसळून २७ विद्यार्थ्यांसह शिक्षिकेचा मृत्यू, ४० हून अधिक जखमी

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. शिल्पा चौधरी यांनी सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रभावी अध्यापन व अध्ययन पद्धती विकसित करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. रेवन करोडी यांनी परीक्षा पद्धती आणि अध्ययन निष्पत्तीशी संलग्न मूल्यमापन प्रक्रिया यांविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यशाळेला विविध महाविद्यालयांतील ७५ हून अधिक प्राध्यापकांनी उपस्थिती नोंदवली. या कार्यशाळेमुळे प्राध्यापकांना नवीन अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती मिळाली असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होईल, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी सांगितले.

महाविद्यालयाच्या फार्माकोग्नोसी विभागाचे विभागप्रमुख डॉ. रेवण करोडी यांना त्यांच्या संशोधन आणि उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी महाविद्यालयातर्फे ‘उत्कृष्ट प्राध्यापक’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. शिल्पा चौधरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा पांडे आणि माही पहाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. वैभव वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे विश्वस्त श्री तेजस पाटील व संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button