Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नेवासा मतदारसंघातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वेगवान पावले; टँकरऐवजी नियमित पाणीपुरवठ्यावर भर

प्रलंबित १८ पाणीपुरवठा योजनांचा आढावा; १६ रेट्रोफिटिंग योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात. टँकरद्वारे पाणीपुरवठा हा पहिला नव्हे, तर शेवटचा पर्याय असला पाहिजे. उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात नेवासा विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे, पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते.

अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा

मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, ज्या पाणीपुरवठा योजनांची कामे ७५ ते ९९ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत, त्यांमधील वीजजोडणी, पाइपलाइन जोडणी, किरकोळ दुरुस्ती आणि निधीअभावी रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. नियमित निधी मिळण्यास विलंब होत असल्यास आवश्यकतेनुसार टंचाई निवारण आराखड्यातून निधी उपलब्ध करून ही कामे मार्गी लावावीत.

अपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित पाणीपुरवठा योजना लवकर कार्यान्वित होतील आणि टँकरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या कामांसाठी कालबद्ध नियोजन करून त्यांची अंमलबजावणी वेगाने करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित १८ पाणीपुरवठा योजनांपैकी १६ रेट्रोफिटिंग योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. उर्वरित कामे डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करून गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा –  कचऱ्यापासून सीबीजी निर्मितीला चालना; महाराष्ट्रातील शहरांमध्ये प्रकल्प उभारणीसाठी टास्क फोर्स स्थापन करणार

टँकरच्या फेऱ्यांवर डिजिटल नियंत्रण

टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना पारदर्शकता राखणे आणि संभाव्य गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. टँकरची संख्या वाढण्यामागील वस्तुस्थिती तपासून प्रत्यक्ष गरजेनुसारच टँकरचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.

टँकरच्या फेऱ्यांची नोंद, प्रत्यक्ष पाणीपुरवठा आणि पाण्याचे वितरण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग ॲप प्रणाली लागू करण्याबाबतही बैठकीत भर देण्यात आला. या प्रणालीमुळे टँकरच्या हालचालींवर देखरेख ठेवणे आणि पाणीपुरवठ्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे शक्य होऊ शकते.

पर्यायी उपाययोजनांना प्राधान्य

पाणीटंचाईच्या काळात थेट टँकर सुरू करण्याऐवजी पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करावा, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. यामध्ये आवश्यकतेनुसार विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरत्या नळयोजना आणि पाइपलाइनची कामे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच आडवे बोअर घेणे यांसारख्या उपायांचा समावेश आहे.

उपलब्ध पाणीस्रोतांचा योग्य वापर करून टंचाईग्रस्त गावांना शाश्वत आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. अपूर्ण योजना पूर्ण करणे, टँकरच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आणि पर्यायी जलस्रोत विकसित करणे या उपायांद्वारे नागरिकांना दिलासा देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

योजनेच्या दुसऱ्या वर्षात जिल्हानिहाय कृती आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी, विविध योजनांचा समन्वय आणि प्रत्यक्ष परिणामांचे मूल्यमापन यावर भर दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची कृषी उत्पादकता वाढविण्याच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील दखल महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group