Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्री, लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा

पुणे | आपल्या अमोघ लावण्य, ठसकेबाज लावणी आणि सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तथा लोककलावंत मधु कांबीकर यांचे पुण्यात निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या दीर्घ आजाराशी झुंज देत होत्या; अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी, लोककला आणि रंगभूमीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मधु कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे एका कलावंत कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात लावणी कलावंत म्हणून तमाशाच्या फडातून केली. लोककलेच्या समृद्ध वारशातून आलेला अभिनय आणि नृत्याचा ठसका त्यांनी पुढे रुपेरी पडद्यावर नेला. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक नाटके आणि दूरदर्शन मालिका अशा प्रत्येक माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र छाप पाडली.

हेही वाचा

विरोधकांचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा भेटीस स्पष्ट नकार!

‘शापित’ ते ‘झपाटलेला’; अविस्मरणीय भूमिकांचा वारसा

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ चित्रपटातील त्यांच्या प्रभावी अभिनयाने संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटातील भूमिकेचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी मोठे कौतुक केले. त्यानंतर ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘डेबू’, ‘येऊ का घरात’ आणि ‘आज झाले मुक्त मी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. अस्सल मराठमोळी लोककला जपणाऱ्या आणि तिला पडद्यावर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या एका ज्येष्ठ कलावंताच्या जाण्याने मराठी सांस्कृतिक विश्वातील एक समृद्ध पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button