ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विशेष व्याख्यान व पारितोषिक वितरण

डुडुळगाव : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या डुडुळगाव शैक्षणिक संकुलातील कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त ‘प्रतिजैविक प्रतिकारशक्तीशी लढा’ या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मेडिकोव्हर हॉस्पिटलच्या डॉ. नुपूर केदारे यांचे विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. नुपूर केदारे यांनी प्रतिजैविकांचा अयोग्य व अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिजैविक प्रतिकारशक्तीच्या समस्येवर प्रकाश टाकला. प्रतिजैविकांचा योग्य, आवश्यक आणि जबाबदार वापर करणे गरजेचे असून, या संदर्भात जनजागृती करण्यामध्ये फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविषयी जनजागृती करणारी प्रभावी घोषवाक्ये सादर केली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा –  आदित्य आणि अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ३०० हून अधिक आंदोलकांवरही कारवाई

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार श्री. विलास लांडे, संस्थेचे सचिव मा. श्री. सुधीर मुंगसे, खजिनदार श्री. अजित गव्हाणे, विश्वस्त मा. श्री. विक्रांतजी लांडे तसेच विश्वस्त मा. श्री. सुमित मुंगसे यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच भविष्यातील फार्मासिस्ट म्हणून त्यांची सामाजिक, नैतिक व व्यावसायिक जबाबदारी अधोरेखित झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button