Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजपचे ४ प्रमुख नेते वेगळा निर्णय घेणार, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित मनमानी कारभारावरून देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘इंडिया’ आघाडी आणि कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत तीव्र आंदोलन छेडले असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या राजकीय घडामोडींमुळे भाजपमध्ये अंतर्गत मोठी फूट पडली असून, भाजपचे चार बडे नेते लवकरच वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत; परिणामी पुढील पाच ते सहा महिन्यांत भाजप सरकार सत्तेत दिसणार नाही आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “देशात जी प्रचंड खदखद निर्माण झाली आहे, ती केवळ विरोधकांमध्येच नाही तर थेट भाजपमध्येही उफाळून आली आहे. आणीबाणीच्या काळात आणि नंतर जनता पक्षाच्या स्थापनेवेळी ज्याप्रमाणे बाबू जगजीवन राम, हेमवती नंदन बहुगुणा यांच्यासारख्या दिग्गजांनी काँग्रेस सोडली होती, अगदी तशीच स्थिती आज भाजपमध्ये उद्भवली आहे. भाजपमध्ये अंतर्गत दुफळी आणि तिफळी माजली आहे. मोदी-शहा यांच्याविरोधात देशभरात जनक्षोभ उसळला असताना भाजपचा एकही प्रमुख नेता किंवा केंद्रीय मंत्री त्यांच्या समर्थनार्थ पुढे येताना दिसत नाही. मोदी-शहा यांच्या पर्वाचा अस्त आता स्पष्टपणे दिसू लागला आहे.”

हेही वाचा

“मोगॅम्बो मोदींच्या दडपशाहीला युवा वर्ग उसळून उत्तर देईल”; राहुल गांधींचा थेट हल्लाबोल

दिल्लीतील आंदोलनाचा दाखला देत राऊत म्हणाले, “मोदी आणि शहा केवळ सैन्यबळाच्या जोरावर खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीत जम्मू-काश्मीर, आसाम, छत्तीसगडमधील केंद्रीय सशस्त्र दलांचे जवान उतरवूनही जनतेचा आक्रोश थांबलेला नाही. काल हजारो आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, तरीही लोक रस्त्यावर उतरत आहेत.”

तुषार गांधींच्या अटकेवरून फडणवीसांवर निशाणा

मुंबईत झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “मुंबईत शांततेत आंदोलन करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या हुकूमशाहीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलिसांना जाहीर माफी मागावी लागेल. मी स्वतः आणि आदित्य ठाकरे पोलीस ठाण्यात गेलो, तिथे ठिय्या दिला आणि पोलिसांवर दबाव आणून तुषार गांधींची सुटका करून घेतली.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button