Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“मोगॅम्बो मोदींच्या दडपशाहीला युवा वर्ग उसळून उत्तर देईल”; राहुल गांधींचा थेट हल्लाबोल

नवी दिल्ली | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेतील कथित घोळाविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (CJP) जंतरमंतरवर पुकारलेल्या आंदोलनाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध करणारा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मोदी सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. तसेच, आगामी १२ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षही सीजेपीच्या या मोर्चात अधिकृतपणे सहभागी होणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, “अमित शाहंचे दिल्ली पोलीस आता उघड गुंडगिरीवर उतरले आहेत. आंदोलनातील तरुणी आणि महिलांवरही अमानुष कारवाई करण्याची मुभा पोलिसांसह भाजप-आरएसएसच्या लोकांना देण्यात आली आहे. ‘मोगॅम्बो मोदी’ आणि त्यांचे सरकार जितकी दडपशाही करेल, तितक्याच ताकदीने देशातील युवा वर्ग आणि ‘जेन झी’ (Gen Z) त्यांना रस्त्यावर उतरून सडेतोड उत्तर देतील. १२ ऑक्टोबरला काँग्रेसही या आंदोलनात खांद्याला खांदा लावून उतरेल आणि तरुणाईचा हा बुलंद आवाज सरकारला ऐकावाच लागेल.”

हेही वाचा

संगीताच्या अलवार लहरींवर डोलले रसिक प्रेक्षक!

गृहमंत्री अमित शाह यांना थेट इशारा देत राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही १० हजार, २० हजार किंवा ४० हजार पोलीस आणा, आम्ही मागे हटणार नाही. ही लढाई आता थांबणार नाही. देशात संविधानाचे तुकडे कसे केले जात आहेत, हे सांगण्यासाठी सोमवारी आम्ही सरन्यायाधीशांची (CJI) भेट घेणार आहोत. कायद्याचे सर्वोच्च रक्षक म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधून सोयीस्कर भूमिका घेता येणार नाही, संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात असताना आम्ही शांत बसणार नाही.”

अभिजीत दिपकेंची सशर्त सुटका

दरम्यान, रविवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही जंतरमंतर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी परिसरातील ३७ प्रमुख रस्ते व स्पॉट्स पूर्णपणे सील केले असून वल्लभ पंथ मार्गावर आंदोलकांसाठी राखीव बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विमानातून प्रतिबंधात्मक ताब्यात घेतलेले सीजेपीचे नेते अभिजीत दिपके यांची पोलिसांनी सशर्त सुटका केली आहे. सध्या हे आंदोलन अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नाही, या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button