Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय! दरड कोसळल्याने बुढी गंडकी नदीला महापूर; ३ मोठे पूल वाहून गेले

काठमांडू | एका बाजूला महाराष्ट्रात पावसाच्या मोठ्या तुटीमुळे दुष्काळी संकट गडद झाले असताना, शेजारील नेपाळमध्ये मात्र निसर्गाचा वेगळाच प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात आलेल्या भीषण पुरातून सावरत असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा महापुराने हाहाकार माजवला आहे. नेपाळच्या गोरखा जिल्ह्यातील बुढी गंडकी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे तीन मोठे पूल वाहून गेले असून नदीकाठच्या परिसराचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखा जिल्ह्यातील चुमनुब्री गावाजवळ डोंगरावरील मोठी दरड कोसळल्याने बुढी गंडकी नदीचा प्रवाह काही काळ अडवला गेला. त्यामुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फुगवटा तयार झाला आणि खालच्या भागात अचानक पाण्याचा वेगवान लोंढा उसळला. या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने क्षणात रौद्ररूप धारण केले, ज्यामध्ये परिसरातील तीन पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहात तिनकेसारखे वाहून गेले. पुरामुळे अनेक घरे, सार्वजनिक मालमत्ता आणि रस्ते खचल्याने या भागातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे.

हेही वाचा

नूतन अभियांत्रिकीच्या प्रसिद्धी प्रमुख प्रिती घुले यांची रांगोळीतून रेणुकामातेला भक्तीपूर्ण आदरांजली!

नदीची पाणीपातळी धोकादायक पातळीच्या वर पोहोचल्याने स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावले उचलली असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा (हायअलर्ट) जारी केला आहे. नागरिकांना सुरक्षित आणि उंचावरील भागात जाण्याचे निर्देश देण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्यात सक्रिय झाली आहेत. तसेच भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी सखल भागातील गावांचे स्थलांतर तातडीने युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button