Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरणाच्या अडचणी दूर होणार; सहकार मंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे

पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी तांत्रिक अडचणी मुख्यमंत्री समितीसमोर मांडणार; बाबासाहेब पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर निर्णय

मुंबई : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आधार प्रमाणीकरण करताना काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत. या अडचणींवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. या आश्वासनानंतर शेतकरी बांधवांनी आपले उपोषण मागे घेतले.

राष्ट्रीय मराठा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळकर यांच्यासह शेतकरी बांधवांनी विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे ५ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे वाढते वय, शेतीच्या कामामुळे बोटांचे ठसे झिजणे यांसह अन्य कारणांमुळे काही पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येत आहेत. केवळ तांत्रिक अडचणींमुळे पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासन संवेदनशीलतेने विचार करीत आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्रात जपानी उद्योगांसाठी गुंतवणुकीच्या नव्या संधी; ‘जपानने महाराष्ट्राकडे धोरणात्मक भागीदार म्हणून पाहावे’

आधार प्रमाणीकरणातील या तांत्रिक अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर मांडण्यात येतील. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले.

शेतकरी बांधवांच्या मागण्या संवेदनशीलतेने ऐकून घेत त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर अंकुशराव पाटील होनाळकर यांनी आझाद मैदान येथे ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरणात अडचणी येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button