Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत वि. वेस्ट इंडिज पहिला टी-२० सामना आज! कधी, कुठे व कसे पाहावे थेट प्रक्षेपण? जाणून घ्या..

India vs West Indies 1st T20 | आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानला नमवून ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर आणि वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला थरार आज, ६ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर आता फटाफट क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्येही उभय संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना केव्हा खेळवला जाणार?

या दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला टी-२० सामना ६ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.

पहिला टी-२० सामना कुठे खेळवला जाणार आहे?

लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

सामना किती वाजता सुरू होणार?

सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

हेही वाचा

‘भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला पण..’; रोहित पवारांचा गंभीर आरोप, पुणे बंदचा इशारा

सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.

सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?

मालिकेचे सामने हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

एकदिवसीय मालिकेत भारताचा २-१ ने विजय

नुकत्याच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-१ अशा फरकाने मालिका खिशात घातली. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारताने प्रत्येकी ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. तिसऱ्या सामन्यात विंडीजने ५ गडी राखून विजय मिळवत पुनरागमन केले असले, तरी भारताने मालिका जिंकण्यात यश मिळवले. आता टी-२० मालिकेतही हाच विजयी फॉर्म कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार असेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button