TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

संजय दत्तांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचा पलटवार; ‘पाकिस्तानात १५ दिवस राहून पाहा’

संजय राऊत आणि रोहित पवारांवरही नितेश राणेंची टीका; सरकार पडण्याच्या दाव्यांवरून राऊतांना टोला

मुंबई : अभिनेता संजय दत्त याने काही दिवसांपूर्वी भारतातील परिस्थितीबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘भारतामध्ये पूर्वीसारखी शांतता दिसत नाही. जुने दिवस पुन्हा यावेत, अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो,’ असे वक्तव्य संजय दत्तने केले होते. त्यावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत संजय दत्त यांच्यावर निशाणा साधला.

संजय दत्त यांच्या वक्तव्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, कलाकार भारतात राहून मोठे होतात आणि याच देशात आपले नाव कमावतात. सध्या देशात सुरक्षिततेचे वातावरण असून नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत, असा दावा त्यांनी केला. भारतातील परिस्थिती समजून घेण्यासाठी आजूबाजूच्या देशांमध्ये जाऊन तेथील परिस्थिती पाहावी, असेही राणे यांनी म्हटले.

‘पाकिस्तानमध्ये जाऊन १५ दिवस राहावे. आजूबाजूच्या दोन-पाच देशांमध्ये राहिल्यानंतर भारत किती सुरक्षित आहे, हे त्यांना कळेल,’ असा टोला नितेश राणे यांनी संजय दत्त यांना लगावला.

हेही वाचा –  तुकाराम मुंढेंचा आता दारू आणि प्रोटीन पावडर विक्रेत्यांवर मोर्चा; भेसळखोरांवर FDAची कडक कारवाई

संजय राऊतांवरही निशाणा

दरम्यान, नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत यांनी केलेली एखादी भविष्यवाणी खरी ठरल्याचे उदाहरण दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

सरकार स्थापन झाल्यापासून संजय राऊत सरकार दोन किंवा चार महिन्यांत पडेल, असे दावे करत आहेत; मात्र सरकार कायम असून अधिक भक्कम होत असल्याचा दावा राणे यांनी केला. ‘आता त्यांचे घरचेच त्यांना गांभीर्याने घेत नाहीयेत,’ असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

रोहित पवारांवरही टीका

नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मूळ मुद्दा विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. मात्र, आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकार सुरक्षित नसतील, तर माध्यमांनी रोहित पवारांच्या बातम्या का दाखवाव्यात, याचाही विचार करायला हवा, असे राणे यांनी म्हटले.

दरम्यान, संजय दत्त यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या या राजकीय वादात आता नितेश राणे यांच्या प्रतिक्रियेमुळे आणखी भर पडली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button