Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

५०० च्या नोटेवर आक्षेपार्ह रील भोवली! महात्मा गांधींची खिल्ली उडवणाऱ्या महिला इन्फ्लुएन्सरला अटक

Simran Patel | महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ५०० रुपयांची नोट दाखवून त्यावर आक्षेपार्ह व अपमानास्पद रील तयार करणे एका महिला कंटेंट क्रिएटरला चांगलेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या सिमरन पटेल (वय ४७) या महिलेला सुरत पोलिसांनी अटक केली आहे. एका समाजसेवकाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही तातडीने कारवाई केली.

२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. त्याआधी १ ऑक्टोबर रोजी दुपारी सिमरन पटेल हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तिने सुरुवातीला महात्मा गांधींना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर ५०० रुपयांची नोट दाखवून त्यावर अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह वर्तन केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

हेही वाचा

विश्वविक्रमी सोहळ्यात भाजपच्या सेवाकार्याचा जागर; पक्ष संघटनेच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम!

स्थानिक समाजसेवक धर्मेश गामी यांच्या निदर्शनास हा व्हिडीओ आल्यानंतर त्यांनी तातडीने सुरत पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टच्या (IT Act) कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करून सिमरन पटेल हिला बेड्या ठोकल्या. अटक केल्यानंतर पोलिसांनी वादग्रस्त भाग ब्लर करत या महिलेचा ‘बिफोर अँड आफ्टर’ व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. पहिल्या भागात ती महात्मा गांधींची खिल्ली उडवताना दिसते, तर दुसऱ्या भागात ती कोठडीत माफी मागताना आणि दिलगिरी व्यक्त करताना दिसत आहे.

पोलिसांचा सोशल मीडिया युजर्सना इशारा

सिमरन पटेल या गेल्या १७ वर्षांपासून सुरतमध्ये वास्तव्यास असून त्या नियमितपणे सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करत असतात. या कारवाईनंतर सुरत पोलिसांनी सर्व कंटेंट क्रिएटर्सना कडक शब्दांत इशारा दिला आहे. “सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी महापुरुषांचा अवमान करणे किंवा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणे खपवून घेतले जाणार नाही. अशा विकृत मानसिकतेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button