एमआयटी आळंदीत ‘मॅथलेटिक्स’आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात

पिंपरी-चिंचवड : एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी येथील गणित विभागाच्या वतीने ‘मॅथलेटिक्स – पॉवर युवर ब्रेन’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ९ विविध महाविद्यालयांतील एकूण २४७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत पोस्टर सादरीकरण, पीपीटी सादरीकरण, प्रश्नमंजुषा, संशोधन पेपर सादरीकरण, व्हिडिओ निर्मिती, लुडो आणि बुद्धिबळ अशा विविध बौद्धिक स्पर्धांचा समावेश होता. सहभागी विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, तर्कशक्ती आणि सादरीकरण कौशल्य यांचे उत्कृष्ट दर्शन घडवत मोठ्या उत्साहाने स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन ब्लूबायसन सायबरचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल साबळे यांच्या हस्ते झाले.
हेही वाचा – अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार; ‘घटनात्मक पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी निर्णय’

पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, डॉ अक्षदा कुलकर्णी, डॉ रश्मी लाड, प्रा विजयालक्ष्मी व प्रमुख पाहुणे श्री. स्वामीराज सूर्यकांत भिसे यांच्या हस्ते पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम गणित विभागप्रमुख सौ. सुषमा चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. राहुल खलाटे व श्री. मनोज ढाके यांनी काम पाहिले. गणित विभागातील डॉ प्रदीप पानसरे ,डॉ संगीता बिराजदार ,डॉ श्रीराम कार्गावकर , प्रा. संजय गुंजाळ , प्रा. मंजुळा चौधरी, प्रा वसंत कारामाड प्रा ,हनुमत मावकर, प्रा राही शेख प्रा संध्य लटपटे तसेच विद्यार्थी समन्वयक सार्थक मंथळे व सोमलिंग शेळके यांचे स्पर्धेच्या यशस्वीतेचे मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपली बौद्धिक क्षमता विकसित करण्याची व विविध स्पर्धांमध्ये चमकण्याची उत्तम संधी मिळाली. विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद व उत्स्फूर्त सहभाग पाहता, भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.





