ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत कु. दिपिका जगताप हिने द्वितीय क्रमांक मिळून विभागस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड

पिंपरी-चिंचवड : स्वामी विवेकानंद रायफल शुटिंग रेंज, संभाजीनगर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत ओपन साईट एअर रायफल शूटिंग स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील कु. दीपिका गणेश जगताप 12th Sci हिने 145 गुण नोंदवत द्वितीय क्रमांक मिळविला. त्यामुळे तिची प्रथम पाच खेळाडूंमध्ये शालेय विभाग स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या खेळाडूंला कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा गोपीचंद सदाशिव करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

हेही वाचा –  शिवराम राघुजी ढोरे यांचे दुःखद निधन

या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group