जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत राजमाता जिजाऊ ची यशस्वी कामगिरी

पिंपरी-चिंचवड : संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर येथे झालेल्या शालेय बॉक्सिंग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी विविध वजनी गटात 09 सुवर्णपदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलेले आहे. त्यामुळे या सुवर्णपदक मिळवणाऱ्या सर्व खेळाडूंची प्रवरानगर, लोणी जिल्हा अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभाग स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
निकाल -17 वर्षाखालील मुले- 1) कु. रूद्र खामकर (50 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक 2) कु. साईराज हळीकर (52 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक 3)कु.मल्हार कपिले (54 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक 4)कु. प्रज्वल सीतापुरे (63 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक
19 वर्षाखालील मुले व मुली- 1) कु. नीरज यादव (52 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक 2)कु.पार्थ तांबेरे (75 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक 3)कु. निश्चय जीनवाल (81 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक 4) कु. प्राची वाघमोडे 48 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक 5) कु. चैत्राली लांडगे (52 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.





