ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवराम राघुजी ढोरे यांचे दुःखद निधन

इंदुरी : येथील शिवराम राघुजी ढोरे यांचे दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने ढोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कै. शिवराम राघुजी ढोरे यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जेष्ठ नेते श्री. बबनराव राघुजी ढोरे यांचे ते कनिष्ठ बंधू तर पंचायत समिती सदस्य श्री. दिलीप नामदेव ढोरे यांचे ते चुलते होते. विद्यमान सदस्य श्री दत्तात्रय शिवराम ढोरे यांचे ते वडील आहे.

हेही वाचा –  सिंधुदुर्गच्या आंबा-काजू शेतीला AI ची जोड; ४०० शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कै. शिवराम राघुजी ढोरे यांचा दशक्रिया विधी दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या मूळ गावी इंदूरी येथे इंद्रायणी काठी धार्मिक विधीनुसार संपन्न होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button