ताज्या घडामोडीपुणे

डिजिटल युगात सतर्क राहा : वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख

ओएसिस कॉलेज ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

पुणे / प्रतिनिधी

सध्या मोबाइल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी शेअर करणे, लाइव्ह लोकेशन टाकणे तसेच अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन मैत्री करणे, सोशल मीडियावर कोणतीही माहिती किंवा फोटो शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करावा आणि डिजिटल माध्यमांचा वापर जबाबदारीने करावा. बदल स्वतःपासून सुरू करा, असे आवाहन नऱ्हे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी केले.

महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नऱ्हे येथील ओएसिस कॉलेज ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी वर्षा देशमुख बोलत होत्या.

या कार्यक्रमास नऱ्हे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस हवालदार उर्मिला काकडे, कॉलेजच्या प्राचार्या अश्विनी दौलत बाफना, संयोजक विजया गुजराथी आणि आस्ता जूनगडे, प्रीती भाटकर, श्रुती बजाज, शुभांगी जवळगेकर उपस्थित होते.

हेही वाचा –  शंभूराजांचे शौर्य अन् विद्वत्ता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवनकार्याचा, सत्य, अहिंसा, साधेपणा आणि देशसेवेच्या विचारांचा गौरव करण्यात आला.

कॉलेजच्या प्राचार्या अश्विनी दौलत बाफना म्हणाल्या, “महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जगाला दिला. आजच्या डिजिटल युगातही गांधीजींचे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून सत्य, शिस्त, अहिंसा आणि सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे. गांधीजींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे,” असे प्रतिपादन प्राचार्या अश्विनी दौलत बाफना यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button