ताज्या घडामोडीपुणे

शंभूराजांचे शौर्य अन् विद्वत्ता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

स्वतंत्र शालेय पाठ्यपुस्तकासाठी शिवशाही प्रतिष्ठानची बालभारतीकडे मागणी

– ऐतिहासिक पुराव्याधारित इतिहासाच्या समावेशाचा आग्रह

पुणे । प्रतिनिधी :

छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, विद्वत्ता, प्रशासनकौशल्य, साहित्यनिर्मिती, स्वराज्यरक्षण आणि बलिदानाची सर्वांगीण ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी त्यांच्या जीवनकार्याचा शालेय अभ्यासक्रमात समर्पक समावेश करावा, अशी मागणी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यने केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती, पुणे येथे निवेदन देण्यात आले.

इयत्ता पाचवी किंवा त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित स्वतंत्र पाठ्यपुस्तक प्रकाशित करावे, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची मांडणी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुरूप पद्धतीने करावी, असेही प्रतिष्ठानने नमूद केले आहे.

हेही वाचा –  पोटभर जेवल्यानंतरही वारंवार भूक लागते? ‘ही’ कारणे असू शकतात; दुर्लक्ष करू नका

चित्रे, कालरेषेतून इतिहासाची सुलभ ओळख

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना अधिक सुलभपणे समजावा, यासाठी पाठ्यपुस्तकात चित्रे, महत्त्वाच्या घटनांची कालरेषा आणि पूरक माहिती समाविष्ट करावी, अशी सूचना निवेदनातून करण्यात आली आहे. त्यांच्या शौर्याबरोबरच विद्वत्ता, प्रशासन आणि साहित्यनिर्मितीचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, यावर प्रतिष्ठानने भर दिला आहे. या मागणीच्या अनुषंगाने प्रतिष्ठानच्या वतीने शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी स्वतंत्र शालेय पाठ्यपुस्तकाची आवश्यकता आणि अभ्यासक्रमातील समर्पक समावेशाबाबत चर्चा करण्यात आली.

‘जीवनकार्य पुढील पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावे’

“छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्य आणि बलिदान पुढील पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समर्पक समावेश व्हावा, यासाठी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे,” असे संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी सांगितले. “छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबरोबरच त्यांची विद्वत्ता, प्रशासन आणि स्वराज्यरक्षणातील योगदान विद्यार्थ्यांना अभ्यासता यावे, यासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तकाची आवश्यकता आहे. या मागणीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू,” असे प्रदेश कार्याध्यक्ष अथर्व सुनील तावरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या इतिहासाची अभ्यासपूर्ण आणि सर्वांगीण ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असून, संबंधित विभागाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रतिष्ठानने व्यक्त केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button