निवडणूक आयोगाविरोधात ‘आप’ आक्रमक; सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर परिसरात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेत संपूर्ण परिसर तातडीने रिकामा केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आम आदमी पार्टीचे (आप) दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक विरोधी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. ‘कॉकरोच जनता पार्टी’सह (CJP) इतर विरोधी संघटनांचे कार्यकर्ते आणि नेते जंतरमंतरवर मोठ्या संख्येने जमा झाले होते. मात्र, कायदा व सुरक्षेचे कारण पुढे करत दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला पूर्वपरवानगी नाकारली होती. आंदोलक एकत्र येताच पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत कारवाई करत परिसर मोकळा केला. पोलिसांच्या कडक नाकेबंदीनंतरही आंदोलकांच्या काही गटांनी जनपथ आणि टॉलस्टॉय मार्ग परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा
दोन विषारी इंजेक्शन्स देऊनही महिला कैदी जिवंत; अमेरिकेत मृत्युदंडाची प्रक्रिया अयशस्वी!
#WATCH | Delhi | Police barriers are placed near the Nizamuddin area as security is heightened in Central Delhi, in view of possible protests against the Election Commission pic.twitter.com/VCy3RD3xSS
— ANI (@ANI) October 2, 2026
५ हजार जवानांचा कडक बंदोबस्त
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मध्य दिल्ली परिसराला छावणीचे रूप आले आहे. जंतरमंतर आणि लगतच्या संवेदनशील भागात सुमारे ५,००० सुरक्षा कर्मचारी, जलद कार्यदल (RAF) आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





