TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईतील पाच टोलनाक्यांवर टोल दरवाढ; वाहनधारकांच्या खर्चात वाढ

१ ऑक्टोबरपासून नवे दर लागू; मिनी बस, एलसीव्ही, ट्रक आणि अवजड वाहनांना १५ ते ३५ रुपयांपर्यंत अधिक टोल

मुंबई : मुंबईत जाणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबईतील पाच महत्त्वाच्या टोलनाक्यांवरील टोल दरात वाढ केली आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली असून, वाहनांच्या प्रकारानुसार १५ ते ३५ रुपयांपर्यंत अधिक टोल भरावा लागणार आहे.

MSRDC कडून तब्बल तीन वर्षांनंतर टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार मिनी बस आणि एलसीव्ही वाहनांसाठी ९० रुपये, तर ट्रक आणि बससाठी १८० रुपये टोल आकारला जाणार आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहनांसाठी २५५ रुपये टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकडे नियमित ये-जा करणाऱ्या संबंधित वाहनधारकांच्या प्रवासखर्चात वाढ होणार आहे.

कोणत्या वाहनांना टोलमधून सूट?

सरकारने ऑक्टोबर २०२४ पासून हलकी वाहने, बेस्ट बस, एसटी बस आणि शालेय वाहनांना टोलमधून सूट दिली आहे. त्यामुळे या वाहनांना नव्या दरवाढीचा थेट परिणाम होणार नाही. मात्र मिनी बस, एलसीव्ही, ट्रक, बस आणि अवजड वाहनांना टोल लागू राहणार आहे.

हेही वाचा –  ‘सुशासनाचा गाभा शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा ‘अंत्योदय’वर भर

पाच टोलनाक्यांवर वसुली

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ५५ उड्डाणपुलांच्या खर्चाची वसुली करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर येथे टोलनाके सुरू करण्यात आले आहेत. या टोलनाक्यांवरून होणारी टोलवसुली २०२७ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी २०२३ मध्ये टोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांनी MSRDC कडून पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील सूचना बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, १ ऑक्टोबरपासून वाहनधारकांना नव्या दरानुसार टोल भरावा लागणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button