Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

ऐन सणासुदीत LPG सिलिंडर महागला! व्यावसायिक गॅसच्या दरात मोठी वाढ

Commercial LPG Cylinder LPG Price Hike | दसरा आणि दिवाळी या प्रमुख सणांच्या तोंडावर देशातील तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमागे ६३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत २ हजार ७६४ रुपयांवर पोहोचली आहे, तर दिल्लीत ६२.५० रुपयांच्या वाढीसह दर २ हजार ८१० रुपये झाला आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढत असतानाच झालेल्या या दरवाढीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांच्या उत्पादन व संचालन खर्चात मोठी भर पडणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या सुधारित दरपत्रकानुसार प्रमुख शहरांतील किंमती खालीलप्रमाणे आहेत. मुंबईमध्ये ६३ रुपयांच्या वाढीसह दर २,७०१ रुपयांवरून २,७६४ रुपयांवर पोहोचला आहे, तर नवी दिल्लीत ६२.५० रुपयांच्या वाढीसह दर २,८१० रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर आता २,९८३ रुपयांना मिळणार असून पाटणामध्ये सर्वाधिक ७१.५० रुपयांची वाढ होऊन दर ३,१००.५० रुपयांवर गेला आहे. तसेच लखनऊमध्ये ६२.५० रुपयांच्या वाढीनंतर नवीन दर २,९३२.५० रुपये झाला आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ९.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती, त्यानंतर लागोपाठ दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा

‘भाषा विवादाचे नव्हे, सुसंवादाचे माध्यम’; फडणवीसांचा दीर्घकालीन जलव्यवस्थापनावर भर

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर; सामान्यांना दिलासा

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झालेली असताना, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आल्यामुळे सामान्य गृहिणी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button