ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सायबर फसवणुकीविरोधात पोलिसांना ‘सायबर वॉरियर्स’चे मार्गदर्शन

टिळकनगर पोलीस ठाण्यात सायबर जागरूकता सत्र; संशयास्पद कॉल, संदेश आणि पेमेंट स्कॅम्सविषयी माहिती

डोंबिवली : ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेता टिळकनगर पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी विशेष सायबर जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. प्रगती महाविद्यालय आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात डिजिटल व्यवहारांदरम्यान घ्यावयाच्या खबरदारीवर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रगती महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर प्रिया कदम यांनी फ्रॉड कॉल्स, फसवे मेसेजेस आणि पेमेंट स्कॅम्सचे स्वरूप स्पष्ट केले. यावेळी ‘अँटीव्हायरस डॉट कॉम’सह विविध सायबर सुरक्षा ॲप्लिकेशन्सची माहिती देण्यात आली. ‘सायबर वॉरियर्स’ ॲप पोलिसांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून सक्रिय करण्यात आले. संशयास्पद डिजिटल हालचाली ओळखण्यासाठी आणि मोबाईलवरील व्यवहार अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी हे ॲप उपयुक्त असल्याचे सत्रात सांगण्यात आले. ॲप सक्रिय करण्यासाठी ‘०५८’ हा कोड वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा –  स्वीडनच्या संसदेत पोहोचताच नीला विखे पाटील यांचे मोठे वक्तव्य; ‘दहा वर्षांपासून काका-चुलत भावाशी संपर्क नाही’

या उपक्रमात क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सहसंचालक अजय शिर्के तसेच प्रिया कदम आणि मयुरी बनकर यांनी सहभाग घेतला. सायबर गुन्ह्यांच्या बदलत्या पद्धतींबाबत पोलिसांना अद्ययावत माहिती देण्याच्या दृष्टीने हे सत्र आयोजित करण्यात आले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button