ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत राजमाता जिजाऊ मुलांच्या संघाला सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक    

पिंपरी चिंचवड :  एच. ए. स्कूल पिंपरी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील मुलांच्या संघाने  एच. ए. स्कूल पिंपरी च्या संघाचा 8-4 अशा 4 गुणांच्या फरकाने सलग तिसऱ्यांदा विजेते पद मिळवले. त्यामुळे प्रथम क्रमांक प्राप्त या सर्व खेळाडूंची शालेय विभागस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या संघामध्ये कु. सुरज ढमढेरे, मुआज खान, मयूर धोत्रे, कु. कुणाल शिंदे, सुरज बुरुड, विश्वजीत ओव्हाळ, यशराज जाधव, हिमांशू शर्मा, मयुरेश जाधव, सुरज बुरुड, यश शिंदे, अमन शेख, रवींद्र गायकवाड, इत्यादी खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

हेही वाचा –  Asian Games 2026: कमलजीत-सुरुचीची सुवर्ण कमाल; भारताला शूटिंगमध्ये पहिलं गोल्ड

या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group