ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डीच्या डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयात पाच दिवसीय राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 ​वास्तुशास्त्र शिक्षण आणि उद्योगातील दुवा साधण्यासाठी विशेष उपक्रम; 'COA-TRC' च्या सहकार्याने आयोजन

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :

डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी आणि ‘काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (COA-TRC), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम) नुकताच उत्साहात संपन्न झाला. “Connect the Disconnect: Industry Responsive Architectural Education” या महत्त्वपूर्ण विषयावर ७ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान या ऑनलाईन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

​या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने सरस्वती वंदनेने झाली. पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. जयश्री देशपांडे आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. छाया तिरविर यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची संकल्पना, मुख्य उद्दिष्टे, स्वरूप आणि पाच दिवसांच्या सत्रांची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.

​वास्तुशास्त्र शिक्षण (Architectural Education) आणि प्रत्यक्ष व्यावसायिक क्षेत्रातील (Industry) अंतर कमी करून त्यांच्यातील दुवा अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. पाच दिवसांच्या या कालावधीत शिक्षणतज्ज्ञांनी खालील प्रमुख समकालीन विषयांवर सखोल मार्गदर्शन केले:

हेही वाचा –  ‘ज्ञानेश कुमार भारताचे शत्रू’; SIR वादावर अभिजीत दीपकेंचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

​नवीन व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती 

​आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (Outcome-Based Education – OBE)

​उद्योगाभिमुख शिक्षण व प्रभावी मूल्यमापन पद्धती

​एआय (AI) आणि कॉम्प्युटेशनल डिझाईनचा वापर

​वास्तुशास्त्रातील संशोधन, शाश्वत पद्धती आणि आंतरशाखीय समस्या निवारण

​विविध क्षेत्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ व अनुभवी वास्तुविशारदांनी घेतलेल्या सत्रांमुळे सहभागी प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगाच्या बदलत्या गरजा आणि शैक्षणिक पद्धतींची योग्य सांगड घालण्याबाबत अत्यंत मोलाचा दृष्टिकोन मिळाला.

​हा कार्यक्रम ‘काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर’चे अध्यक्ष प्रा. किरण एस. महाजनी आणि COA-TRC च्या संचालिका व संयोजिका प्रा. जयश्री देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. छाया तिरविर यांनी मुख्य कार्यक्रम समन्वयक म्हणून, तर प्रा. सीमंतिनी नाकील व प्रा. पूजा गांधिले यांनी सह-समन्वयक म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली.

​या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. सतेज पाटील, विश्वस्त मा. श्री. तेजस पाटील, संचालक (ऑपरेशन्स) मा. सौ. स्नेहा तेजस पाटील तसेच कॅम्पस संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button