पिंपरी-चिंचवडकरांनो लक्ष द्या! गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा व्यवस्थेतील देखभाल-दुरुस्तीची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये सेक्टर क्रमांक २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा विषयक स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यानुसार गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहकार्याचा हात!
त्यामुळे नागरिकांनी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. तसेच शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




