Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम रद्द होणार? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

IPL Impact Player Rule | इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामापूर्वी क्रिकेटविश्वात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या दोन हंगामांपासून प्रचंड वादग्रस्त आणि चर्चेत ठरलेला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ (Impact Player) नियम अखेर रद्द करण्याचे संकेत आयपीएल प्रशासनाने दिले आहेत. याशिवाय, मागील तीन वर्षांपासून परदेशात होणारे खेळाडूंचे ऑक्शन यंदा भारतात होणार असून तीन वर्षांनंतर ऑक्शनची मायदेशी घरवापसी होणार आहे.

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे सामन्यादरम्यान फलंदाजाऐवजी अतिरिक्त गोलंदाज किंवा गोलंदाजाऐवजी अतिरिक्त फलंदाज उतरवता येत असल्याने अष्टपैलू (All-rounder) खेळाडूंचे महत्त्व पूर्णपणे कमी झाले होते. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, शुबमन गिल आणि अक्षर पटेल यांसारख्या प्रमुख खेळाडूंनी या नियमाविषयी उघड नाराजी व्यक्त केली होती. फ्रँचायझी आणि प्रशिक्षकांनीही या नियमामुळे डावपेच आखणे कठीण होत असल्याची भूमिका मांडली आहे. बीसीसीआयच्या आगामी बैठकीत या नियमावर अंतिम निर्णय घेऊन तो हद्दपार केला जाण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा

भारतावर १००% टॅरिफची टांगती तलवार! अमेरिकन संसदेत वादग्रस्त विधेयक मंजूर

तीन वर्षांनंतर आयपीएल ऑक्शन मायदेशात

आयपीएल २०२७ हंगामासाठीचे ऑक्शन ‘मिनी ऑक्शन’ स्वरूपात भारतातच पार पडणार आहे. गेल्या तीन वर्षांत हे ऑक्शन दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी येथे आयोजित करण्यात आले होते. आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नोव्हेंबर-डिसेंबरच्या काळात भारतात लग्नसराई असल्याने योग्य त्या सोयीसुविधा आणि हॉटेल्स उपलब्ध न झाल्याने ऑक्शन परदेशात न्यावे लागले होते, मात्र यंदा हे ऑक्शन भारतातच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) अरुण धुमाळ यांची पुन्हा एकदा आयपीएल चेअरमनपदी नियुक्ती होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button