ताज्या घडामोडीपुणे

कृत्रिम बुद्धिमत्ता च्या वेग व बदलांवर चर्चा करा – दीपक शिंगण

पीसीयू मध्ये स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचा दीक्षारंभ संपन्न

पिंपरी, पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील बदलांवर चिकित्सक पद्धतीने लक्ष ठेवून विद्यार्थ्यांनी याविषयी सतत जिज्ञासा ठेवावी, नव कल्पनांना प्रोत्साहन द्यावे आणि तांत्रिक घडामोडींचा सातत्याने अभ्यास करावा. भारताला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व करण्याची मोठी संधी असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी नवोन्मेषी दृष्टिकोन स्वीकारावा, असे क्रिस्टा चे सीनियर डायरेक्टर ऑफ इंजिनिअरिंग दीपक शिंगण यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या साते, मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स च्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष २०२६–२७ प्रथम वर्ष ‘दीक्षारंभ’ आयोजित करण्यात आला.

यावेळी अक्कॉप्स सिस्टीम्स चे सह-संस्थापक विजेंद्र यादव, स्केल्ड एजिल ट्रान्सफॉर्मेशनचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट डॉ. महेंद्र रामदासी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी आणि स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचे प्रमुख डॉ. कमलेश मेश्राम आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी पीसीईटीच्या ३५ वर्षांहून अधिक शैक्षणिक परंपरे बद्दल सांगितले. उद्योगभिमुख अभ्यासक्रम, जपानी व कोरियन उद्योगांसोबतचे सहकार्य, जागतिक संधी आणि कौशल्याधारित शिक्षणाचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनावे असे सांगितले.

हेही वाचा –  अश्लील डीजे डान्स मुक्त पुणे या आमच्या प्रयत्नांना अखेरीस यश – टिना शर्मा घेवारे

डॉ. कमलेश मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना हॅकेथॉन, उद्योग मान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा सायन्स आणि नव तंत्रज्ञान, नवकल्पना स्वीकारून प्रत्येक संधीचा लाभ घेत यशस्वी करिअर घडवा असे सांगितले.

डॉ. महेंद्र रामदासी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी व्यावसायिक आयुष्यातील वेग आणि बदल स्वीकारावा. तांत्रिक कौशल्यांसोबतच सातत्याने शिकणे, पुन्हा शिकणे आणि आवश्यकतेनुसार जुन्या पद्धती विसरून नव्या पद्धती स्वीकारणे ही यशस्वी व्यावसायिकाची खरी ओळख आहे. बदल हा व्यावसायिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने त्यासाठी सदैव तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले.

विजेंद्र यादव यांनी सायबर सुरक्षा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि भारतासाठी स्वदेशी सायबर सुरक्षा उपाय विकसित करण्याच्या गरजा यावर मार्गदर्शन दिले. तसेच मजबूत प्रोग्रामिंग कौशल्ये, मूलभूत संकल्पनांवरील प्रभुत्व आणि समस्यांकडे जिज्ञासूपणे पाहण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी विकसित केली पाहिजे. भविष्यातील डिजिटल युद्धांमध्ये सायबर सुरक्षा महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त व कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीयू चे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button