सचिन तापकीर यांच्या पाठपुराव्याला यश, खंडोबामाळचा प्रलंबित रस्ता अखेर खुला!
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ पासूनचा प्रश्न मार्गी

– प्राइड वर्ल्ड सिटीमधून ९० मीटर डीपी रस्त्याला जोडमार्ग, सुमारे २,५०० कुटुंबांना दिलासा
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
खंडोबामाळ परिसरातील नागरिकांचा २०१५ पासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न नगरसेवक सचिन श्रीधर तापकीर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागला. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या पाठपुराव्याला यश आले असून, प्राइड वर्ल्ड सिटीमधून ९० मीटर डीपी रस्त्याला जोडणारा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. सचिन तापकीर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या मार्गाचे उद्घाटन केले.
या जोडमार्गामुळे सन सिटी, सेवन हिल, सैनिक कॉलनी, सिद्धिविनायक नगर आणि आसपासच्या परिसरातील सुमारे २,५०० कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. परिसरातून ९० मीटर डीपी रस्त्यावर जाण्यासाठी जोडणी उपलब्ध झाल्याने नागरिकांची दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होणार आहे.
हेही वाचा – “राज्यस्तरीय कॅडेट व युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कु. तनिष्का हरिचंद्र शिंदे हिची निवड”

दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा मार्ग खुला करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सचिन तापकीर यांनी प्राइड वर्ल्ड सिटीचे अरविंद जैन यांचे मनःपूर्वक आभार मानले. उद्घाटनप्रसंगी अजित बुर्डे, शशिकांत बुर्डे, भाऊशेठ रासकर, बाळासाहेब काटे, संतोष पठारे, सी. बी. कुलकर्णी, पिराजी काशीद आणि विशाल दाभाडे उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“खंडोबामाळ परिसरातील नागरिक २०१५ पासून या जोडरस्त्याच्या प्रतीक्षेत होते. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आज प्राइड वर्ल्ड सिटीमधून ९० मीटर डीपी रस्त्याला जोडणारा मार्ग खुला झाला, याचा मला विशेष आनंद आहे. या जोडणीमुळे सन सिटी, सेवन हिल, सैनिक कॉलनी, सिद्धिविनायक नगर आणि आसपासच्या परिसरातील सुमारे २,५०० कुटुंबांची रोजची ये-जा अधिक सुलभ होईल. हा मार्ग खुला करण्यासाठी सहकार्य करणारे प्राइड वर्ल्ड सिटीचे अरविंद जैन आणि या प्रयत्नात साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.”
– सचिन तापकीर, नगरसेवक, भाजपा.




