ताज्या घडामोडीपुणे

शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्चस्व

पुणे : दि.12 व 13 सप्टेंबर 2026 रोजी कावेरी नगर क्रीडा संकुल वाकड पुणे येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय वुशू क्रीडा स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य,व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील विद्यार्थी खेळाडूंनी 19 व 17 वर्ष मुले व मुलींच्या वयोगटात विविध वजनी गटात 14 सुवर्णपदक, 03 रौप्यपदक व 02 कांस्यपदक मिळवित उल्लेखनीय संपादन केलेले आहे.

निकाल-19 वर्षाखालील मुले-

1) प्रथम क्रमांक -कु. आदित्य चव्हाण 11वी कला (-48 किलोग्रॅम)

2) प्रथम क्रमांक – कु.कार्तिक जगताप 11वी कला (-52 किलोग्रॅम)

3) प्रथम क्रमांक – कु. सुमित कांबळे 11वी कला (-56किलोग्रॅम)

4) प्रथम क्रमांक -कु. सदन अन्सारी 12वी वाणिज्य (-60 किलोग्रॅम)

5) प्रथम क्रमांक -कु. शुभम जाधव 12वी कला (-70 किलोग्रॅम)

6) प्रथम क्रमांक -कु. पार्थ तांबेरे 12वी वाणिज्य (-80 किलोग्रॅम)

7) प्रथम क्रमांक -कु. निश्चय जिनवाल 12वी वाणिज्य (-85 किलोग्रॅम)

8) द्वितीय क्रमांक – कु. कार्तिक काळे 11वी विज्ञान (-80 किलोग्रॅम )

9) तृतीय क्रमांक -विनीत नाईक 12वी वाणिज्य (-45 किलोग्रॅम)

हेही वाचा –  बटाटे खाण्याची हेल्दी पद्धत; ‘हे’ ४ प्रकारचे पोटॅटो सॅलड नक्की ट्राय करा

17 वर्षाखालील मुले-

1) प्रथम क्रमांक – कु. दिवाकर पांडे 11वी वाणिज्य (-48 किलोग्रॅम)

2) प्रथम क्रमांक – कु.साईराज हळीकर (-52 किलोग्रॅम)

3) प्रथम क्रमांक – कु.अमित माने 11वी कला  (-60 किलोग्रॅम)

4)प्रथम क्रमांक – कु. सारांश केंगार 11वी विज्ञान (-80 किलोग्रॅम)

5) द्वितीय क्रमांक – कु. शंभूराजे क्षीरसागर 11वी वाणिज्य (-65 किलोग्रॅम )

6) तृतीय क्रमांक- कु. आदित्य शिंदे 11वी वाणिज्य  (-75 किलोग्रॅम )

19 वर्षाखालील मुली-

1)  प्रथम क्रमांक – कु. प्राची वाघमोडे 11वी कला (-52 किलोग्रॅम)

2) प्रथम क्रमांक – कु. चैत्राली लांडगे 11वी कला (-70किलोग्रॅम),

3) प्रथम क्रमांक- कु. दीक्षा शेलार 12वी वाणिज्य (-60किलोग्रॅम)

4) तृतीय क्रमांक – कु. दिव्या जगताप 12वी विज्ञान (-45किलोग्रॅम)

यातील प्रथम क्रमांक प्राप्त 14 खेळाडूंची  दिनांक 22 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. गतवर्षी देखील कनिष्ठ महाविद्यालय चार खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रमदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group