थेरगावच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाप्पाचे पारंपरिक वेषात अन् ढोल-ताशांच्या गजरात दिमागदार आगमन!

पिंपरी चिंचवड : न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव येथे श्री गणरायाचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळेत भव्य आगमन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून ढोल-ताशांचा गजर, लेझिमचे प्रात्यक्षिक आणि हातात फडकणारे ध्वज यांसह संपूर्ण थेरगाव परिसर भक्तीमय अन् आनंदमयी करून सोडला. विद्यार्थ्यांच्या या ऊर्जेने आणि शिस्तीने उपस्थितांची मने जिंकली.
हेही वाचा – शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्चस्व
शाळेच्या प्रांगणात विधीवत पूजा अर्चा करून श्री गणरायाची मूर्ती मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापित करण्यात आली. या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पवार, खजिनदार सौ. सुरेखा पवार, मुख्याध्यापिका सौ. विद्या नाईक आणि सौ. नायगम ॲग्नेस यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”शाळेत भारतीय संस्कृती आणि परंपरांची जपणूक व्हावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना व उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने या गणेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग खरोखरच कौतुकास्पद आहे.”
— श्री. विजय पवार (संस्था अध्यक्ष,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव संस्था)





