Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

MPSCच्या ‘गट क’ची संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ बाबत मोठा निर्णय घेतला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून, सुधारित वेळापत्रकानुसार ती थेट ३ जानेवारी २०२७ रोजी घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलण्याची ही सलग तिसरी वेळ असल्याने राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आयोगाचे उपसचिव (जाहिरात विभाग) विवेक देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. शासनाच्या विविध विभागांतील गट-क संवर्गातील पदांसाठी ही परीक्षा ऑफलाइन (ओएमआर पद्धतीने) घेण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता, वाहतूक व्यवस्था, स्थानिक परिस्थिती, राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२६, आगामी सणासुदीचे दिवस, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक, हिवाळी अधिवेशन तसेच जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल या सर्व प्रशासकीय बाबींचा विचार करून परीक्षेची तारीख बदलण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता; विदर्भासह मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’

तिसऱ्यांदा परीक्षा लांबणीवर

आयोगाने या परीक्षेचे वेळापत्रक वारंवार बदलले आहे. यापूर्वी १२ जुलै, २७ सप्टेंबर आणि त्यानंतर २५ ऑक्टोबर अशी तारीख जाहीर करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. २०२६ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेली भरती प्रक्रिया आता थेट २०२७ मध्ये जाणार असल्याने उमेदवारांचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परीक्षा केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षेची वेळ आणि इतर तपशीलवार सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळेत उपलब्ध करून दिल्या जातील, असेही आयोगाने नमूद केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button