Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशभक्तांसाठी सरकारचा मोठा उपक्रम; राज्यभर २० लाख भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानातून २० हजार आरोग्य शिबिरे; मंडपांपासून ग्रामीण भागापर्यंत मिळणार सुविधा

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सुमारे २० लाख गणेशभक्तांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम राज्य सरकारकडून राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून, सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागापर्यंत नागरिकांना ही आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उपक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुमारे १० हजार सार्वजनिक गणेश मंडळे, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि दाते यांचा सहभाग घेतला जाणार आहे.

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळणार आहे.

हेही वाचा –  MPSC उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांची फेरपडताळणी करण्याची संधी

आजारांचे वेळेत निदान करण्यावर भर

नागरिकांना त्यांच्या परिसरात आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि विविध आजारांचे वेळेत निदान करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. तपासणीदरम्यान आरोग्यविषयक समस्या आढळल्यास संबंधित रुग्णांना पुढील तपासणी आणि उपचारांसाठी संदर्भित करण्यात येणार आहे.

उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य आयुक्तालय, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार

तपासणीनंतर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचाराचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी ७ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी

गेल्यावर्षी २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १२ हजार ६५५ आरोग्य शिबिरांमध्ये ७ लाख ४ हजार ७३ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यापैकी १८ हजार ८०० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले होते.

तसेच, आयोजित करण्यात आलेल्या २३६ रक्तदान शिबिरांमध्ये १६ हजार ७९८ नागरिकांनी रक्तदान केले होते. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदा त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group