पिंपरी-चिंचवड स्थायी समितीची साप्ताहिक सभेत कोट्यवधींच्या प्रस्तावांवर होणार निर्णय!
PCMC : सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली हाेणार उद्या सभा

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत तब्बल १८ विषयांवर चर्चा व निर्णय अपेक्षित आहे, ज्यात पाणीपुरवठा, मैलानि:सारण, दिव्यांग कल्याण, क्रीडा सुविधा आणि आरोग्य विभागाच्या खरेदी प्रस्तावांचा समावेश आहे.
नगरसचिव मुकेश खेमा कोळप यांनी सर्व सदस्यांना पाठवलेल्या पत्रानुसार, कार्यपत्रिका क्रमांक ३२ अंतर्गत ही सभा पार पडणार असून, दिनांक २/९/२०२६ रोजी झालेल्या मागील साप्ताहिक सभेचा (कार्यपत्रिका क्र. ३१) सभावृत्तांत कायम करण्यापासून कामकाजाला सुरुवात होईल.
हेही वाचा – गोकुळाष्टमीच्या जल्लोषात ‘सायबर वॉरियर्स’कडून सायबर सुरक्षेचा जागर!
कार्यपत्रिकेवरील सर्व १८ विषय
सभापती अभिषेक बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडल्या जाणाऱ्या कार्यपत्रिका क्रमांक ३२ मधील १८ विषयांचा तपशील पुढीलप्रमाणे:
1. पाणीपुरवठा विभाग — नवी सांगवी भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मे. एस.डी. एन्टरप्रायझेस या ठेकेदाराला २५,१४,०३८ रुपयांपर्यंत काम देण्याबाबत करारनामा करण्यास मान्यता.
2. जलनि:सारण विभाग (ग क्षेत्रीय कार्यालय) — जलनि:सारण नलिकांच्या देखभालीसाठी M/s. S S Pillai या ठेकेदाराला १,०३,६२,७४१ रुपयांपर्यंत काम देण्याबाबत निर्णय.
3. पाणीपुरवठा विभाग — जुनी सांगवी भागात टँकरने पाणीपुरवठ्यासाठी एस.डी. एन्टरप्रायझेसला २५,३१,५१० रुपयांपर्यंत काम देण्याबाबत मान्यता.
4. जलनि:सारण विभाग (इ क्षेत्रीय कार्यालय) — जलनि:सारण नलिकांच्या देखभालीसाठी M/s. S S Pillai यांना १,११,३०,९१० रुपयांपर्यंत काम देण्याबाबत मान्यता.
5. दिव्यांग भवन फाऊंडेशन — मोरवाडी येथील २४,००० चौ. फुटांच्या दिव्यांग भवन प्रकल्पाच्या संचालक मंडळाच्या (मा. आयुक्त, मा. महापौर, मा. सभापती स्थायी समिती अभिषेक बारणे, मा. विरोधी पक्षनेता आदींचा समावेश) कार्योत्तर मान्यतेबाबत विचार.
6. क्रीडा-सांस्कृतिक — गणेशनगर थेरगाव येथील खिंवसरा पाटील व्यायामशाळा ‘मयूरबाग मित्र मंडळ’ या संस्थेला चालवण्यास देण्याबाबत निर्णय.
7. क्रीडा-सांस्कृतिक — रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील पहिल्या मजल्यावरील कलादालन ‘अंशुल क्रिएशन’ संस्थेला वार्षिक ७५,००० रुपये नाममात्र भाड्याने चालवण्यास देण्याबाबत मान्यता.
8. क्रीडा विभाग — शहरातील ८९ व्यायामशाळांपैकी ५ व्यायामशाळा ११ महिने कराराने सेवाशुल्क तत्त्वावर संबंधित मित्र मंडळे/संस्थांना चालवण्यास देण्याबाबत निर्णय.
9. समाजकल्याण — “भटके विमुक्त दिवस” (३१ ऑगस्ट) निमित्त विविध सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांसाठी ३,३०,१०० रुपये खर्चास मान्यता.
10. पर्यावरण अभियांत्रिकी विभाग — रावेत, आकुर्डी, चिंखली, चिंचवड भाटनगर मैलाशुद्धीकरण केंद्र व पंप हाऊस येथील विद्युत देखभाल-दुरुस्तीसाठी मे. एक्सेल इंजिनिअर्स यांना १,१४,४१,६३९ रुपयांपर्यंत काम देण्याबाबत मान्यता.
11. आरोग्य विभाग — ब्लॅक फिनेल खरेदीसाठी मे. श्रीराम अॅग्रो एजेन्सीज यांच्याकडून ५,१८,००० रुपये खर्चास मान्यता.
12. नगरसचिव (महापौर कक्ष) — स्वातंत्र्य दिनानिमित्त २,००० टोप्या खरेदीसाठी ५,०४,००० रुपये खर्चाचे अवलोकन.
13. क्रीडा-सांस्कृतिक — महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित स्पर्धेच्या उर्वरित बिलापोटी १५,४१,६१० रुपये अदा करण्यास मान्यता.
14. क्रीडा-सांस्कृतिक — इंडो अॅथलेटिक सोसायटी आयोजित “सायकल स्वारी २०२६” साठी खाद्यपदार्थ पुरवठ्याचे ८,३०,००० रुपये खर्चास कार्योत्तर मान्यता.
15. आरोग्य विभाग — सेन्टेंड फिनेल खरेदीसाठी मे. सिनेक्टिक्स बायोसायन्स यांच्याकडून ५,६६,००० रुपये खर्चाचे अवलोकन.
16. शिक्षण/वैद्यकीय — यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयांतर्गत बी.एस.सी. नर्सिंग कॉलेजच्या अध्यापकांचे तासिका तत्त्वावरील सुधारित मानधन दर (एकूण ४,६७,२५० रुपये) अदा करण्यास मान्यता.
17. ह क्षेत्रीय कार्यालय — प्रभाग क्र. २० मधील शौचालय/मुतारी स्वच्छतेसाठी मे. महर्षी वाल्मीकी स्वयं-रोजगार सेवा संस्थेला
१,५४,९८,२३६ रुपयांचे (२ वर्षांसाठी) काम देण्याबाबत मान्यता.
18. ह क्षेत्रीय कार्यालय — प्रभाग क्र. ३१ व ३२ मधील शौचालय/मुतारी स्वच्छतेसाठी मे. संत गाडगेबाबा महाराज बेरोजगार संस्थेला
४३,५८,५६६ रुपयांचे (२ वर्षांसाठी) काम देण्याबाबत मान्यता.





