TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

KBC 18 : अमिताभ बच्चन यांच्या समोर अक्षय कुमारच्या पर्सला लागली आग; सैफ अली खानही झाला थक्क

‘माझा फोटो आहे’ म्हणत अक्षयने बिग बींना दिला धक्का; पर्स उघडताच घडला मजेशीर प्रकार

Kaun Banega Crorepati 18 : भारतातील लोकप्रिय रिॲलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १८वा सीझन सध्या सुरू आहे. महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा शोचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये गेमप्ले आणि लाइफलाइन्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, आगामी ‘हैवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान नुकतेच ‘केबीसी 18’च्या मंचावर आले होते.

११ सप्टेंबर २०२६ रोजी ‘हैवान’ हा थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अमिताभ बच्चन यांनी अक्षय आणि सैफसोबत अनेक गप्पा मारल्या. याचवेळी बिग बींनी अक्षयला त्याच्या वॉलेटमध्ये कोणाचा फोटो ठेवतोस, असा प्रश्न विचारला. त्यानंतर अक्षयने केलेल्या प्रँकमुळे अमिताभ बच्चन यांच्यासह सैफ अली खानलाही क्षणभर धक्का बसला.

‘तुझ्या वॉलेटमध्ये चार्ली चॅप्लिनचा फोटो असतो ना?’

केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी अक्षयला म्हटले की, तू चार्ली चॅप्लिनचा मोठा चाहता आहेस आणि तुझ्या वॉलेटमध्ये त्यांचा फोटोही ठेवतोस. त्यावर अक्षयने होकार देत आपण चार्ली चॅप्लिनचा मोठा फॅन असल्याचे सांगितले.

यानंतर बिग बींनी अक्षयला त्याचे वॉलेट दाखवण्यास सांगितले. त्यावर अक्षयने मिश्कीलपणे उत्तर दिले, “सर, तुमचा फोटो आहे.” हे ऐकून अमिताभ बच्चन यांनी आश्चर्याने, “माझा फोटो?” असे विचारले.

हेही वाचा – १७ वर्षांपासून अंथरुणावर असलेल्या गोविंदाच्या मदतीला मंत्री प्रताप सरनाईक; उपचारांचा संपूर्ण खर्च उचलणार

पर्स उघडताच लागली आग

यानंतर अक्षय आपल्या खुर्चीवरून उठून अमिताभ बच्चन यांच्या जवळ गेला. त्याने वॉलेट उघडताच अचानक त्यातून आग लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अमिताभ बच्चन आणि सैफ अली खान दोघेही दचकले.

मात्र, अक्षय कुमार मात्र या संपूर्ण प्रकारावर हसताना दिसला. हा एक प्रँक असल्याचे त्याने नंतर स्पष्ट केले. त्यानंतर अक्षयने अमिताभ बच्चन यांचा तरुण वयातील फोटोही दाखवला.

अमिताभ बच्चन यांचाही मजेशीर टोला

अक्षयने फोटो दाखवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याचे आभार मानले. त्याचवेळी बिग बींनी अक्षयला मिश्कीलपणे टोला लगावत, “तू तर आगीशी खेळतोस की…” असे म्हटले.

सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अक्षय कुमारच्या या मजेशीर प्रँकमुळे ‘KBC 18’च्या मंचावरील हा प्रसंग सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button