बलुचिस्तानात रक्ताचा सडा! BLAच्या दोन मोठ्या हल्ल्यांत पाकिस्तानी लष्कराचे २५ जवान ठार

Balochistan Violence Pakistan | पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्ष पेटला आहे. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने (BLA) केलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे तब्बल २५ जवान ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केल्याने संपूर्ण प्रांतात तणाव शिगेला पोहोचला आहे.
बीएलएच्या अधिकृत निवेदनानुसार, त्यांच्या ‘फतेह स्क्वॉड’ने झियारत क्रॉस परिसरात लष्करी ताफ्याला लक्ष्य करून भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराची दोन वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून १८ जवान जागीच ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले. दुसऱ्या एका कारवाईसह मृतांची एकूण संख्या २५ वर पोहोचल्याचे बीएलएने म्हटले आहे.
Bodies of Army personnel who lost their lives in Balochistan are being sent to their families.
But Not a single report on these deaths has appeared on Pakistan’s official channels.
Isn’t dying for these Generals personal interests, when they won’t even report your death, simply… pic.twitter.com/XYlzbFsLWK
— برهان الدین | Burhan uddin (@burhan_uddin_0) September 4, 2026
हेही वाचा
एमआयटी आळंदीमध्ये महिला सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांवर चर्चासत्र संपन्न; सुकन्या मंचचा पुढाकार
या हल्ल्यानंतर बीएलएने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये जोरदार स्फोट, धुव्वाधार गोळीबार आणि पाकिस्तानी लष्कराचा एक ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच फुटीरतावादी लढाऊ सैनिक जळालेल्या लष्करी ट्रकमधून शस्त्रे आणि दारूगोळा हस्तगत करतानाही या व्हिडिओत दिसत आहेत.
बलुच फुटीरतावाद्यांची मोहीम तीव्र
गेल्या अनेक दशकांपासून फुटीरतावादी चळवळ आणि सरकारी दडपशाहीच्या विळख्यात अडकलेल्या बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याविरोधातील कारवाया अधिक आक्रमक केल्या आहेत. मागील काही महिन्यांत सुरक्षा दलांवर झालेला हा सर्वात मोठा आणि थेट हल्ला मानला जात आहे.





