ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माई सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी अनुराधा विशाल काळभोर यांची निवड

महिला सक्षमीकरणासह जलसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि संस्कृती जतनासाठी फाऊंडेशनचा पुढाकार

पिंपरी- चिंचवड : महिला व युवतींमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण करण्याबरोबरच जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, संस्कृतीचे जतन, पारंपरिक सण-उत्सवांचे संवर्धन आणि महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या व्यापक उद्देशाने काळभोरनगर येथे ‘माई सोशल फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली. गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या स्थापना सभेत फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी अनुराधा विशाल काळभोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

विविध वाद्य-संगीताच्या प्रशिक्षक तथा संगीत विशारद प्रांजली पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. महिलांना सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंवर्धन व पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती, भारतीय संस्कृती व पारंपरिक सण-उत्सवांचे जतन, तसेच महिलांसाठी गृहउद्योग व कुटिरोद्योगाच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. महिलांमधील कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठीही विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा –  आय आय बी एम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट (IIBM College of Hospitality Management)

अध्यक्षीय भाषणात प्रांजली पाटेकर म्हणाल्या, “प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही कलागुण दडलेले असतात. महिलांनी आपल्या कलागुणांना समाजासमोर आणून विविध छंद जोपासले पाहिजेत. त्यातून स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्याबरोबरच समाजाच्या प्रगतीतही योगदान देता येते.”

नवनिर्वाचित अध्यक्षा अनुराधा विशाल काळभोर यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या महिला सदस्यांचे वाढदिवस उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेचे नियोजन सोनाली काळे, नेहा कालेकर, प्राची काळभोर आणि शिल्पा भालेराव यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group