ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गायत्री स्कूलमध्ये कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न; भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम

​मोशी :  स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ‘गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोशी’ येथे कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात दिमाखात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत संपूर्ण परिसर कृष्णमय करून टाकला होता.

​या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालिका सौ. कविता भोंगाळे-कडू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत आणि विपणन अधिकारी श्री. शैलेंद्र सिंग यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा –  फडणवीस मोदींच्या मंत्रिमंडळात जाणार? पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, ‘महाराष्ट्राला त्यांची गरज’

​विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष श्री. विनायक भोंगाळे म्हणाले, “भगवान श्रीकृष्णांनी जगाला केवळ धर्माची शिकवण दिली नाही; तर सत्य, कर्तव्य, प्रेम, मैत्री आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा मोलाचा संदेश दिला आहे. आजच्या काळात त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन आपण निसर्गरक्षण, समाजात बंधुभाव, गरजूंची मदत आणि व्यसन-हिंसामुक्त समाजाची निर्मिती केली पाहिजे. स्वतःच्या आनंदासोबतच इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करून मानवतेचे ‘गोकुळ’ उभे करणे हीच खरी जन्माष्टमी ठरेल.”

​शाळेत शिक्षण, क्रीडा व वाचन संस्कृतीसोबतच भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे उत्तम कार्य केले जाते, अशा शब्दांत उपस्थित पालकांनी आपल्या समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपस्थितांच्या दाद आणि उत्साहात दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button