Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘हनुमान अंश’च्या दिग्दर्शकांचा बॉलिवूडवर निशाणा; शो कमी केल्याचा केला खुलासा

Hanuman Ansh | आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ६३ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. एका बाजूला चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरू असतानाच, चित्रपटाचे दिग्दर्शक व सह-निर्माते विशाल चतुर्वेदी यांनी सुरुवातीच्या काळात बॉलिवूड आणि मल्टिप्लेक्स चालकांकडून मिळालेल्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘द रौनक पॉडकास्ट’मध्ये बोलताना विशाल चतुर्वेदी यांनी सुरुवातीच्या संघर्षाचा उलगडा केला. चित्रपटाची सुरुवात अवघ्या १० लाख रुपयांच्या ओपनिंगने झाली होती. इतर मोठ्या चित्रपटांच्या दबावामुळे थिएटर मालकांनी ‘हनुमान अंश’चे शो अचानक कमी केले होते. २५० शोवरून थेट २५ शोवर आणण्यात आले होते; इतकेच नव्हे तर पीव्हीआर आणि सिनेपोलिससारख्या नामांकित मल्टिप्लेक्स चालकांनाही हा चित्रपट चालण्याबाबत शंका होती. “चित्रपट फ्लॉप झाला असे वाटत असतानाच सोशल मीडियावरील एका आध्यात्मिक संदेशाने मला लढण्याची प्रेरणा दिली,” असे चतुर्वेदी यांनी सांगितले.

हेही वाचा

स्मृती मानधनाचा ऐतिहासिक पराक्रम! मिताली राजचा विश्वविक्रम मोडीत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल

सुरुवातीच्या अडचणींनंतर प्रेक्षकांच्या ‘माउथ पब्लिसिटी’मुळे चित्रपटाचे चित्र पालटले. सुरत, वडोदरा आणि अलीगड यांसारख्या शहरांमध्ये एकाच शोसाठी झालेली तुफान गर्दी पाहून थिएटर मालकही थक्क झाले. अलीगडमध्ये तर अवघ्या १५ मिनिटांत शो हाऊसफुल झाला. प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे मल्टिप्लेक्स चालकांना पुन्हा शो वाढवणे भाग पडले.

“इंडस्ट्रीत लोक गोंधळलेले आहेत” – विशाल चतुर्वेदी

चित्रपट ‘आवारापन २’ आणि ‘बटवारा’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांसोबत प्रदर्शित झाला होता. इंडस्ट्रीतील भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, “सुरुवातीला जेव्हा मी बॉलिवूडमधील लोकांकडे मदतीसाठी गेलो, तेव्हा कोणीही पुढे आले नाही. इंडस्ट्रीत काय चालेल हे कोणालाच नक्की ठाऊक नसते, तरीही अनेकजण फुकटचा सल्ला देतात. इथे बरेच लोक अत्यंत गोंधळलेले आहेत. चित्रपट यशस्वी झाल्यावर मधुर भांडारकर यांच्यासह अनेकांनी कौतुक केले; पण अडचणीच्या वेळी पाठ फिरवणाऱ्यांची नावे मला घ्यायची नाहीत.”

११ सप्टेंबरला जगभरात होणार प्रदर्शित

भारतात बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवल्यानंतर ‘हनुमान अंश’ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार असून, परदेशातील नीम करोली बाबांच्या भक्तांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button