Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

श्रीनगर विमानतळावर थरार! इंडिगोचे विमान खांबाला धडकले; प्रवाशांची सुरक्षित सुटका

IndiGo Srinagar Airport Accident | नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचा श्रीनगर विमानतळावर उतरल्यानंतर एक विचित्र अपघात झाला. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास विमान पार्किंग बेमध्ये लावत असताना धावपट्टीजवळील ‘व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टीम’च्या (VDGS) पोलला जाऊन धडकले. सुदैवाने या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित असून कोणालाही इजा झालेली नाही, अशी माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे ‘६ई २२५’ (VT-NOG) हे विमान नवी मुंबईहून श्रीनगर विमानतळावर दाखल झाले होते. ‘बे नंबर ६’ वर विमान पार्क केले जात असताना, विमानाचा पुढील भाग (नोझ) थेट व्हीडीजीएस प्रणालीच्या खांबाला जाऊन धडकला. या धडकेमुळे विमानाच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

‘हनुमान अंश’च्या दिग्दर्शकांचा बॉलिवूडवर निशाणा; शो कमी केल्याचा केला खुलासा

प्रवाशांची सुरक्षित सुटका, उड्डाणे सुरळीत:

घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने तातडीने पावले उचलत सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढले. या अपघाताचा श्रीनगर विमानतळावरील इतर विमान उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही; सर्व उड्डाणे वेळेवर आणि सुरळीत सुरू आहेत.

दरम्यान, विमान पार्क करताना हा तांत्रिक किंवा मानवी घोळ नेमका कसा झाला, याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा प्राथमिक अहवाल मागवला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group