TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

‘मी जिवंत असेन तर मोर्चात सहभागी होणार’; हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांचं मोठं वक्तव्य

‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा; हल्ल्यानंतरही आंदोलनात सहभागी होण्याचा बापट यांचा निर्धार

पुणे : गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, विविध स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान, विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ आणि पुण्यात ‘डीजेमुक्ती’च्या मागणीसाठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आपण सहभागी होणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले आहे. हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, “मी जिवंत असेन आणि मोर्चात जाण्यायोग्य परिस्थितीत असेन, तर मी मोर्चात सहभागी होणार आहे,” असे वक्तव्य केले.

पत्रकारांनी मोर्चात सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता बापट म्हणाले की, “हो, मी या मोर्चात सहभागी होणार आहे. काल काही ठरले होते. मात्र, अचानक हल्ल्याची घटना घडली. त्यामुळे जर मी जिवंत असेन आणि मोर्चात जाण्यायोग्य परिस्थितीत असेन, तर मी नक्की सहभागी होणार आहे.”

हेही वाचा –  फॉरेव्हर २० एका शिक्षिकेचे मनोगत

‘मला भीती वाटत नाही’

आपल्याला या घटनेची भीती वाटत नसल्याचेही बापट यांनी सांगितले. मात्र, समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा संदर्भ देत त्यांनी चिंता व्यक्त केली. “मला भीती वाटत नाही. पण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं काय झालं, ते मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यामुळे केव्हा काय होईल, हे मी सांगू शकत नाही,” असे ते म्हणाले.

गणेशोत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, डीजे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ‘डीजेमुक्ती’च्या मागणीसाठी होणाऱ्या मोर्चाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group